Turmeric  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Disease : रिसोड तालुक्यात हळदीवर कंदकुज, करपा रोग

Turmeric Crop : यावर्षात हळदीची मोठ्या क्षेत्रावर लागवड झालेली असून सध्या पिकावर कंदकुज व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Team Agrowon

Washim News : तालुक्यात यावर्षात हळदीची मोठ्या क्षेत्रावर लागवड झालेली असून सध्या पिकावर कंदकुज व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचा पिकाला फटका बसू शकतो, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मॉन्सून परतला असून वातावरणामध्ये काहीसा बदल झालेला आहे. तापमानात वाढ झाली असून ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवत आहे. दररोज पहाटे धुके पडत आहे. याच काळात हळद पिकावर करप्यासह कंदकुज, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सोयाबीनचा हंगाम पूर्णपणे आटोपला असून यावर्षी या पिकाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. उत्पादनामध्ये घट आली असून अपेक्षित बाजारभावही मिळत नसल्यामुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

गतवर्षी हळदीला चांगला बाजार भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी हळदीच्या लागवडीमध्ये वाढ केली. सिंचनाची सुविधा असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे एकर एकरापासून चार एकरांपर्यंत हळदीचे क्षेत्र आहे.

मागील पंधरवड्यापासून हळदीच्या पिकावर करपा, कंदकुज या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हळदीची पाने वाळल्यासारखी दिसत आहेत. हळद नऊ ते दहा महिने कालावधीचे पीक असून ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ कंदवाढीचा असतो. परंतु कंदाची वाढ होण्याच्या कालावधीतच रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हळदीच्या पिकामध्ये कंदकुज किंवा मुळकुज आढळून येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकाचा प्रतिबंधात्मक उपाय करावा. यात प्रतिएकर दोन ते तीन किलो ट्रायकोडर्मा ५० ते १०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळावे. हे मिश्रण हळदीच्या पिकात वापरावे. लगेच हलकेसे पाणी द्यावे. ट्रायकोडर्माचा वापर प्रतिएकर दोन ते तीन लिटर प्रमाणात ठिबकद्वारेही करता येईल.
- राजेश डावरे, कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marigold Flower Rate : लाल-पिवळ्या झेंडूचा भाव वधारला

Crop Damage Survey Issue : पीक नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप सुरूच; शेतकऱ्यांना फटका

Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ

Adulteration Issue : ‘अन्न, औषध’चा भेसळखोरांवर बडगा

Rabi Sowing : रब्बीच्या पेरण्यांची मंदगती

SCROLL FOR NEXT