Sunflower Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Cultivation : अतितमध्ये सूर्यफुलाची यंदा २५ एकरवर लागवड

Sunflower Farming : खरिपात सूर्यफूल लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने उपक्रम हाती घेतला होता. यातून अतित (ता. सातारा) येथे २५ एकरवर लागवड झाली असून पीक दमदार आले आहे.

Team Agrowon

Satara News : अलीकडेच सोयाबीनची वाढणारी क्षेत्र आणि घटणारा दर यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून खरिपात सूर्यफूल लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने उपक्रम हाती घेतला होता. यातून अतित (ता. सातारा) येथे २५ एकरवर लागवड झाली असून पीक दमदार आले आहे.

अतित गावात अनेक शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. गावामध्ये ऊस व आले हे प्रमुख पीक असून त्याबरोबर सोयाबीन, भाजीपाला, रब्बी ज्वारी, गहू, भुईमूग इत्यादी पिकांचे क्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. परंतु अलीकडेच सोयाबीनचे वाढणारे क्षेत्र आणि घटणारा दर यामुळे शेतकरी चिंतेत होते.

अशा प्रसंगांमध्ये सोयाबीनला पर्यायी पीक म्हणून सूर्यफुलाची शेती हा आशेचा नवा किरण कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी नितीन पवार यांच्या मार्गदर्शनातून कृषी सहायक अंकुश सोनावले यांनी गावांमध्ये २५ एकर क्षेत्रावर सूर्यफुलाच्या शेतीचा प्रयोग उभा केला.

यामध्ये गावातील प्रगतिशील शेतकरी गणेश जाधव, चंद्रकांत यादव, दिलीप जाधव, नाना चोरगे, विजय जाधव आदींसह २५ शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सूर्यफुलाची शेती आपल्या शेतात फुलवली आहे. या सूर्यफुलाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी एक पर्यायी पीक तर उपलब्ध झालेच आहे, त्याचबरोबर आपल्या घरात लागणारे शुद्ध असे घाण्यावरचे तेल खाण्यासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध झाला आहे.

त्याचबरोबर या सूर्यफुलाचे वैशिष्ट्य म्हणजे या सूर्यफुलावर अनेक मधमाश्‍या घोंगावत आहेत पिंगा घालत आहेत. त्यामुळे सोयाबीन त्याचबरोबर इतर पिकांची सुद्धा परागीभवनामुळे उत्पादन वाढ होणार आहे. त्याचबरोबर काही पोपटसुद्धा या पिकाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधणार सूर्यफूल पीक हे शेतकऱ्यांना अतिशय उपयोगी पडणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT