Sunflower Farming : सूर्यफुलाची शेतकऱ्यांना ओढ

Sunflower Crop Cultivation : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुक्यात १६० हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाच्या पिकाची लागवड केली आहे.
Sunflower Farming
Sunflower FarmingAgrowon
Published on
Updated on

Daund News : पारंपरिक सूर्यफुलाच्या तेलबियांचे पीक घेऊन त्याचे घाण्यावर भेसळविरहित तेल काढून त्याचा दैनंदिन खाण्यात वापर करण्याकडे कल वाढत आहे. त्याला शासनाच्या कृषी विभागाकडून प्रोत्साहन मिळत असल्याने दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुक्यात १६० हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाच्या पिकाची लागवड केली आहे.

तालुक्यातील मळद या गावात साठ एकर सूर्यफूल पिकाची लागवड झालेली आहे. यंदा पावसाळा लवकर झाल्याने सूर्यफुलाचे पीक जोमात असून सध्या फुलोरा अवस्थेत आहे. फुलोऱ्यातील सूर्यफुलाचे पीक लक्ष वेधून घेत आहेत. ऊस पट्ट्यातील शेतकरीही पिकात बदल करून सूर्यफूल पिकाकडे वळत आहेत. त्यामुळे खाद्यतेल आयात करण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. मळद येथील सूर्यफूल पीक प्रात्यक्षिकाची पुणे विभागाचे सहसंचालक रफिक नायकवडी यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Sunflower Farming
Sunflower Crop: सूर्यफुल पिकाचे खत व्यवस्थापन

केंद्र व राज्य सरकारने पारंपरिक तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत कृषी विभागाने नावीन्यपूर्ण बाब म्हणून महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व इतर गळीतधान्य उत्पादन वाढ मूल्यसाखळी विकास योजनेतून दौंड तालुक्यातील मळद या गावासाठी संकरित सूर्यफूल बियाणे व इतर निविष्ठांचा शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात आला होता. सूर्यफूल बियाण्यांचा पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मळद येथील कृषी सहाय्यक अझर सय्यद यांनी मार्गदर्शन केले.

Sunflower Farming
Sunflower Sowing : कृषी विभागाकडून ३०० हेक्टरवर सूर्यफूल प्रकल्प
खाद्यतेलाच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार तेलबिया उत्पादनासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार दौंड तालुक्यातही कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संकरित सूर्यफूल पिकाचे बियाणे व इतर निविष्ठांचे वाटप करून तेलबिया पिकाच्या लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे.
राहुल माने, दौंड तालुका कृषी अधिकारी
कृषी विभागाने संकरित सूर्यफूल बियाण्याचे वाटप करून मार्गदर्शन केल्याने एकरी आठ ते दहा क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादन मिळणे अपेक्षित आहे.
भीमराव भागवत, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com