Marigold Flower Agrowon
ॲग्रो विशेष

Marigold Flower Rate : नगरमध्ये झेंडूला प्रथमच पंधरा हजारांपर्यंत दर

Marigold Flower Market : गणेशोत्सवामुळे नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत फुलांना मागणी वाढली आहे.

Team Agrowon

Nagar News : गणेशोत्सवामुळे नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत फुलांना मागणी वाढली आहे. कधी कधी मातीमोल दराने विकाव्या लागणाऱ्या झेंडूला सध्या प्रतिक्विंटल ४ हजारांपासून १५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

श्रावणापासून सर्वच फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांतील तेजी कायम असून दरात दुप्पट वाढ झाली आहे. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरी आणि त्याआधी श्रावणामुळे वेगवेगळ्या फुलांना मागणी वाढत आहे.

नगर येथील बाजार समितीत सध्या दररोज साधारणपणे पाचशे ते साडेपाचशे क्विंटल फुलांची आवक होत आहे. त्यात गुलाब, गुलछडी, झेंडू, गलांडा, चमेली, शेवंती, ॲस्टर, लिली, बिजली, कामिनी, कागडा, कागडा पुडी, पामापत्ता, स्पिंगर यासह अन्य फुलांची आवक आहे.

मागणीच्या तुलनेत मात्र पुरवठा नसल्याने दरात तेजी कायम आहे. पहिल्यांदाच झेंडूला ४ हजार ते पंधरा हजारापर्यंत दर मिळत आहे. मंगळवारी (ता. १०) झेंडूची आवक ३८ क्विंटल झाली, तर गुलाबाची आवक ८ क्विंटल झाली. गुलाबाला प्रतिक्विंटल किमान ४,५००, तर कमाल ४० हजार रुपयांचा दर मिळाला.

फुलांचे दर (प्रतिक्विंटल रुपये)

गुलाब ४,५०० ते ४०,०००

गुलछडी १२,००० ते १,००,०००

गलांडा ६००० ते १३,०००

झेंडू ४,००० ते १५,०००

शेवंती ९,००० ते ४०,०००

आस्टर १०,००० ते ४०,०००

गजरे ६०,००० ते १,००,०००

लिली ५०० ते ३७,५००

तुळजापुरी ४,००० ते १२,५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT