Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Crop Damage : सिंधुदुर्गात गव्यांचा उच्छाद; भातपिकांचे प्रचंड नुकसान

Crop Damage Issue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातरोप पुनर्लागवड केलेल्या पिकांचे गव्यांकडून सध्या नुकसान सुरू आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातरोप पुनर्लागवड केलेल्या पिकांचे गव्यांकडून सध्या नुकसान सुरू आहे. दहा ते बारा गव्यांचे कळप गावागावातील जंगलात असून त्यांच्याकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात गव्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या सहा ते सात वर्षांत गव्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. जिल्ह्यातील डोंगर आणि जंगल परिसरात अधिकतर गव्यांचा वावर आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये हजारो गवे आहेत.

एका एका कळपात सहा ते तेरा पर्यंत गवे असतात. दिवसभर जंगलात गव्यांचे वास्तव्य असते. परंतु सायंकाळ होताच ते जंगलापासून नजीक असलेल्या भातपिकांमध्ये घुसून नुकसान करण्यास सुरुवात करतात. गेल्या आठ ते दहा दिवसांत जिल्ह्यातील खांबाळे, सांगुळवाडी, करूळ, सडुरे, शिराळे, कुर्ली (ता. वैभववाडी), हरकुळ, नरडवे (ता. कणकवली), माणगाव, हुमरमळा, वालावल (ता. कुडाळ) या गावांमध्ये गव्यांनी मोठ्या प्रमाणात भातपिकांचे नुकसान केले.

वालावल, हुमरमळा परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला असून भातपिकांचे मोठे नुकसान गवे करीत आहेत. वन विभागाने या गव्यांचा बंदोबस्त तातडीने करावा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
अतुल बंगे, शेतकरी, वालावल, ता. कुडाळ
मी भातरोप पुनर्लागवड करून पंधरा ते वीस दिवस पूर्ण झाले आहेत. भातरोपांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होती. परंतु दहा ते बारा गव्यांनी संपूर्ण पिकांचे नुकसान केले.
तुकाराम वापीलकर, शेतकरी, खांबाळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT