Lumpy Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease : सातारा जिल्ह्यात ‘लम्पी’मुळे दोन जनावरांचा मृत्यू

Animal Disease : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी आजाराने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी आजाराने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. जिल्ह्यात या आजाराने दोन जनावरांचा मृत्यू झाला असून, २५० हून अधिक जनावरे बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

गेल्या वर्षी जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. जिल्हा पशुसंवर्धन विभाग लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाले तरी शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतही दिली होती. जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली होती.

मात्र, गेल्या चार दिवसांपासून लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जावळी व वाई तालुक्यांत प्रत्येकी एका जनावराचा लम्पीने मृत्यू झाला असून, कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई, जावळी या पाच तालुक्यांत लम्पी आजाराने बाधित २५० जनावरे आढळून आली आहेत.

लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून, २ लाख ७८ हजार ८१ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधित जनावरांना ताप येणे, चारा खाण्याचे प्रमाण कमी होणे, अंगावर गाठी येणे अशी लक्षणे दिसून आली आहेत.

जनावरांच्या गोठ्यात गोमाशा, डास यांचा शिरकाव होऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. बाधित जनावरे इतर जनावरांच्या कळपात सोडू नयेत. प्रसंगी गोचिड, गोमांशी निर्मुलनासाठी औषध फवारणी करावी. लम्पीसदृश लक्षणे दिसल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT