Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी

Rain Update : वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी संथगतीने कमी होऊ लागल्याने पुराचा धोका कमी झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. तर वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी संथगतीने कमी होऊ लागल्याने पुराचा धोका कमी झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात संततधार पाऊस सुरू होता. तर वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे दोन्ही धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत होता. या धरणातून पाण्याचा विसर्गही वाढवला होता. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली होती.

त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या काठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्रशासनाने सांगली मिरज महापालिकेसह वाळवा, मिरज, पलूस, आणि शिराळा तालुक्यातील ९७६ कुटुंबांचे आणि २ हजार ७८२ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. तसेच शनिवारपासून (ता. २७) पावसाने उसंत घेतली आहे. तर वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. वारणा धरणातून शनिवारी (ता. २७) सायंकाळी १६३८५ क्युसेकने विसर्ग सुरू केला. रविवारी (ता. २८) सकाळी आठपर्यंत १६९७९ क्युसकने विसर्ग सुरू आहे.

कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली होती. परंतु पावसाचा जोर कमी असल्याने आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ४०.११ इंचांवर स्थिर होती. शनिवारी रात्रीपासून पाणीपातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. रविवारी (ता. २८) सकाळी दहा वाजता आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ३९ फूट १० इंच आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पातळी हळूहळू कमी होऊ लागल्याने पुराची भीती कमी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या: विजय वडेट्टीवार यांची मागणी

Tur Disease Management : तूर पिकावरील करपा, वांझ रोगाचे व्यवस्थापन

Rice Stocks : यंदा तांदळाचा विक्रमी साठा, मोठ्या प्रमाणात निर्यातीची तयारी

Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी

Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार

SCROLL FOR NEXT