Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा जोर

Rain Update : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सर्वदूर जोरदार पाऊस झाला.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सर्वदूर जोरदार पाऊस झाला. तर रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत गडचिरोलीतील चाटेगाव, ब्राह्मणी मंडलात सर्वाधिक १८५ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे वैनगंगा, प्राणहीता, बावनथडी, वणा, कन्हाण या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पेंचतोतलाडोह, इटियाडोह, बाघ शिरपूर, गोसी खुर्द, इरई, निम्न वर्धा या धरणांतील पाणी पातळी वेगाने वाढत असून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

Monsoon Update
Monsoon Rain : राज्यातील २८ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

विदर्भात गेले तीन ते चार दिवस पावसाचा जोर मंदावला होता. त्यामुळे धरणांतील आवक काही प्रमाणात कमी झाली होती. परंतु पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पावसाने सुरुवात केली आहे. विदर्भातील जवळपास २८ मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे शेताशेतात पाणी साचले असून नद्या भरून वाहत आहेत.

त्यामुळे पाणीपातळी वेगाने वाढत आहे. मुसळधार होत असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत असून आर्थिक संकटात सापडला आहे. तर बुलडाणा, अमरावती, वाशीम जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे कापूस, तूर, मूग, उडीद पिकांना चांगलाच दिलासा मिळत असून पिके वाढीच्या अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने आंतरमशागतीची कामे वेगात सुरू आहेत.

Monsoon Update
Monsoon Rain : सततच्या पावसामुळे पिके पिवळी


कोकणात जवळपास सर्वच भागात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. परंतु घाटमाथ्यावर पावसाच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या अजूनही भरून वाहत आहे. रायगडमधील नेरळ मंडलात ३५, बिरवडी ५३, रत्नागिरीतील देवळे ३१, सौंदळ ४३, पाचल ३७, सिंधुदुर्गमधील माणगाव ३१ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे भात खाचरे तुंडूब भरून वाहत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.

तर भोलावडे मंडलात ६४, निगुडघर ५४, वेल्हा ५३, पानशेत ३६, साताऱ्यातील मेढा ४५, पाटण ५६, म्हावशी ५६, हेळवाक ४०, तापोळा ३४, लामज ५३, कोल्हापुरातील बाजार ४१, कोतोली ४२, राधानगरी ५७, कसबा ५७, कडगाव ६०, उत्तूर ८८ मिलिमीटर पाऊस झाला. नगर, नाशिक, सोलापूर, खानदेशात ढगाळ वातावरण कायम असून अधूनमधून तुरळक सरी पडत आहे. मराठवाड्यात अजूनही जोरदार पाऊस नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ चांगली असली तरी अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पिकांची जोमदार आहे. नांदेडमधील मांदवा ४४, दहेली ३९, सिंदगी ३४, उमरी बाजार ४४, माहूर ४० मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत आहे.

येथे पडला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

मंधाळ, पाचखेडी १२७, भिवापूर १२४, खामारी १११, केरडी १०२, धारगाव १११, पालोरा १३०, आमगाव ११३, सावर्ला ११०, आकोडी ११६, तिरोडा १००, मूल, चिखली १०६, शंकरपूर ११३, नागभिड, मिढाळा, मेंढा १००, सावळी, पाथरी, विहाड १०६, गडचिरोली १५०, धानोरा १५३, मुरूमगाव १३४, पेंढरी १३७, करवाफा १२०, बारव्हा १५२, लाखनी १५०, भागडी १०९.

रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)
विदर्भ : यवतमाळ ५४, हिवरी, अर्जुना ४७, कोळंबी ४०, सावरगड, मोहा ५४, बाभुळगाव ५४, वणी ४५, कळंब ५०, कोठा ४५, पिंपळगाव ४३, सावरगाव ४७, जाडमोहा ६५, मेटिखेडा ५७, बोरी ४०, लडखेड, महागाव ४५, तिवरी ५३, अर्णी, जवळा ४५, लोनबेहल ७७, सावळी ४६, बोरगाव ४५, अंजनखेड ४५, वणी ४०, राजूर ४३, भलार ४०, शिंदोळा ४३, गणेशपूर ४९, बोटोनी ५७, करंजी, रुंजा ५७, शिवणी ५७, घोटी, पारवा ४०, कुर्ली ४४, झाडगाव ५१, धानोरा ५२, वरध ५७, कन्नमवरग्राम, ठाणेगाव ४५, तळेगाव ४४, सेलू ४८, हिंगणी ६३, झाडसी ४२, केळझर ४३, शिंदी ५१, विजय गोपाल, भिडी ५९, अंदोरी ४३, गिरोली ४१, वाघोली ५५,

सावळी ५१, कानदगाव ४१, वडनेर ४१, अल्लीपूर ४४, समुद्रपूर ४६, जाम ८७, गिरड ८०, निंदोरी, कोरा ५१, वायगाव ८०, खांढळी ७०, मंडगाव ८७ नागपूर , सीताबर्डी ४७, पार्डी ५४, खापरी ८३, बोरी ७०, हुडकेश्‍वर ५४, सोनगाव ७०, कामठी ५८, वडोदा ५५, दिघोरी ५४, हिंगणा, वानाडोंगरी ६८, कान्होलीबारा ७०, गुमगाव ७१, टकलघाट ७०, कान्हान ५८, निमखेडा, खाट, कोडामेंडी ५९, काटोल, येनवा ५३, उमरेड, मकरधोकडा ५२, बेला ८८, शिर्सी ८०, हेवंती ५२, पाचगाव ५७, माळेवाडा ९२, नंद ९२, कारेगाव ९३, कुही ७७, वेलतूर ८८, तितूर ६१, शहापूर ८४, भंडारा ७७, बेला ८९, पहेला ८९, खोकार्ला ७७, वार्थी ५३, कान्हाळगाव ५९, तुमसर ६३, शिवरा ६०, मिटेवणी ६३, देवडी ६३,

अड्याळ, कोंढा, पवनी, चिंचळ, असगाव ८३, साकोली ६४, सांगडी ६४, विरली ८३, लाखंदूर ९६, मासाळ ८३, पोहारा ८५, पालंदूर ९६, पिंपळगाव ९०, रावणवाडी ७३, गोंदिया ५१, खामरी ५०, कुदवा ५५, परसवाडा ७४, मुंडीकोटा ७२, वाडेगाव ८६, ठाणेगाव ८७, गोरेगाव ७५, कुऱ्हाडी ७६, चिंचगड ६०, नवेगावबांध ६३, बोधगाव देवी, अर्जुनी, महागाव, केशोरी, गोथनगाव ५७, सौदाद ६४, दारव्हा ९२, सडक अर्जुनी, शेडा ५०, कोसामतोडी ७७, घुगस ५७, पडोली ७८, बेंबळ ९३, खांबडा ५०, चिमूर, खडसंगी, भिसी ७२, नेरी, गांभूळघाट ७२, मासाळ ६३, बह्मपुरी, अन्हेर, चौगण ८४, गांगळवाडी, मेंडकी ६५, तालोधी ८६, नावरगाव, शिंदेवाही, मोहाली ७२, पोंभुर्णा ५०, पोरळा ७४, येवळी १६२, कुरखेडा ८९, पुराडा ८२, काढोली ८१, माळेवाडा ७९, अरमोरी ६५, देऊळगाव ७३, पिसेवढथा ७५, वैरागड ७९, चामोर्शी ७०, कुंघाडा ८४, घोट ५२, येनापूर ४३, भेंडाळा ९३, असारळी ५०, कोर्ची ६९, बेडगाव ८१, कोटगुळ ५३, देसाईगंज ९०, शंकरपूर ७८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com