E-Peek Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Record : नांदेड जिल्ह्यात रब्बीत ३४ टक्केच पीकपेरा नोंद

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : ई-पीकपाहणी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक पेरा स्वत:च मोबाइल ॲपच्या माध्यमातून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु रब्बीमध्ये दोन लाख ७१ हजार ९०४ हेक्टर इतक्या पेरणी क्षेत्रापैकी आजपर्यंत केवळ ५३ हजार ५३७ शेतकऱ्यांनी ९२ हजार ३२१ हेक्टरवरील म्हणजेच ३४ टक्के पिकांचा पेरा नोंदविला आहे.

यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील हरभरा हमीभावांतर्गत विक्रीसाठी अडचणीचे जाणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात पेरा नोंदणी केल्यानंतर रब्बीमध्येही शेतकऱ्यांनी पेरा नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. ता. १५ ऑगस्ट ते १५ फेब्रुवारीपर्यंत पेरा नोंदण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

परंतु शेतकऱ्यांचा याला अल्प प्रतिसाद मिळाला. कृषी विभागाने यंदा सर्वसाधारण क्षेत्राच्या १५५ टक्क्‍‌यांनुसार तीन लाख ४८ हजार ८३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचे सांगितले आहे. यात सर्वाधिक दोन लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा तर दहा हजार हेक्टरवर करडईची पेरणी झाल्याची माहिती देण्यात आली.

आता पेरा नोंदणीची जबाबदारी तलाठ्यांवर

ऑनलाइन पेरा नोंद घेण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. प्रशासनाने मोहीम स्वरूपात पेरा नोंदणीसाठी कार्यक्रम राबविला. परंतु यास फारसे यश आले नसल्याचे दिसून आले आहे. यानंतर आता तलाठ्यांना पीक पेरा नोंदणीचे अधिकार आहेत.

तालुकानिहाय ई-पीकपाहणी क्षेत्र (कंसात टक्केवारी)

नायगाव ः ७४९८ (४२.४७), माहूर ः १७७५ (३६.१२), बिलोली ः ६२६५ (२१.८७), किनवट ः १०४५८ (६२.४२), कंधार ः २६९३ (२४.५३), मुदखेड ः २७७४ (१८.२२), हिमायतनगर ः ४९०१ (३७.६५), अर्धापूर ः २७०१ (१३.१९), नांदेड ः १७७५ (७.४१), देगलूर ः ४५०४ (२२.४२), उमरी ः ३९२१ (४५.५७), धर्माबाद ः ५१०१ (२७.७५), लोहा ः ४८२८ (४३.६६), हदगाव ः १५,७३३ (४९.६६), भोकर ः १००७५ (८०.८९), मुखेड ः ७३१० (४२.५५), एकूण ः ९२३२१ (३३.९५)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT