E-Peek Pahani : घरबसल्या ई-पीकपाहणीची सुविधा येत्या खरिपापासून रद्द

E-Peek Pahani Updates : शेतात न जाताच शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई-पीकपाहणी करण्याची सुविधा येत्या खरिपापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
E-Peek Pahani
E-Peek PahaniAgrowon

Pune News : शेतात न जाताच शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई-पीकपाहणी करण्याची सुविधा येत्या खरिपापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात ५० मीटरपर्यंत गेल्याशिवाय पीकपाहणीची नोंद होणार नाही, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

भूमी अभिलेख आयुक्त नि. कु. सुधांशू व ई-पीकपाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या चमूकडून सध्या नव्या ई-पीकपाहणी पद्धतीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. ‘‘केंद्राने आता राज्या-राज्यांतील स्वतंत्र ई-पीकपाहणीची पद्धत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

E-Peek Pahani
E Peek Pahani : ई-पीक पाहणीत रिसोड तालुका अव्वल

त्यानुसार केंद्राने स्वतःची डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) पद्धत येत्या खरिपापासून लागू केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने सध्याची ई-पीकपाहणी पद्धत रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थात, केंद्राने दिलेले उपयोजन (अॅप्लिकेशन) राज्याने स्वीकारलेले नाही. त्याऐवजी राज्याने आधीच्या ई-पीकपाहणी अॅपमध्येच काही बदल करण्याचे ठरवले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या अॅपमधून खरीप २०२४ ची ई-पीकपाहणी करता येईल,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्यात सध्या रब्बीची ई-पीकपाहणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आतापर्यंत हरभऱ्याची ६.४० लाख हेक्टरवरील तर गहू १.५४, ज्वारी १.३०, कांदा १.१४, तर मक्याची १७ हजार हेक्टरवरील ई-पीकपाहणी पूर्ण झालेली आहे.

E-Peek Pahani
E Peek Pahani : ई-पीकपाहणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद

ई-पीकपाहणीच्या कामात ‘हा’ होणार बदल

- भ्रमणध्वनीद्वारे कोणत्याही ठिकाणाहून पीकपाहणी करण्याची पद्धत कायमची रद्द होणार
- गावातील गटात आणि गटातील शेतात प्रत्यक्ष गेल्याशिवाय ई-पीकपाहणी करता येणार नाही
- प्रत्यक्ष शेतात ५० मीटरच्या आत गेल्यानंतरच पिकाचे छायाचित्र अपलोड होईल
- तलाठी स्तरावर होणाऱ्या ई-पीकपाहणीत छायाचित्र काढले जात नव्हते. आता काढावे लागणार.
- ई-पीकपाहणीची कामे तलाठ्याऐवजी आता खासगी सहायक करतील. प्रत्येक गावाला एक सहायक मिळेल.
- सहायकांना तलाठ्याच्या अखत्यारित कामे करावी लागतील. त्यांना केवळ मानधन दिले जाईल.

या तारखांवर लक्ष ठेवा

- चालू रब्बीत ई-पीकपाहणीची सुविधा शेतकऱ्यांना १५ फेब्रुवारीपर्यंतच राहील.
- १६ फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान फक्त तलाठ्यांना रब्बी ई-पीकपाहणी करता येईल.
- केंद्राची चालू रब्बीतील पथदर्शक डीसीएस ई-पीकपाहणीची मुदत १५ जानेवारी २०२४ रोजी संपली आहे.
- डीसीएस ई-पीकपाहणीची रब्बीची फक्त तलाठ्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत २०२४ चालू राहील.
- पुढील खरिपासाठी ई-पीकपाहणीची सुविधा १५ जुलै २०२४ पासून सुरू होण्याची शक्यता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com