Parbhani News : कृषी व महसूल विभागांकडून परभणी जिल्ह्यातील यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र गुरुवारी (ता.१) अंतिम करण्यात आले आहे. त्यानुसार यंदा जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ३३१ हेक्टर (१०७.५८ टक्के) पेरणी झाली आहे. परंतु त्यापैकी सोमवार (ता.१२) पर्यंत केवळ १ लाख ४९ हजार ४९३ हेक्टर (५१.३१ टक्के) क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली आहे.
यंदाचे रब्बी पेरणी क्षेत्र व ई-पीकपाहणी क्षेत्र यामध्ये १ लाख ४१ हजार ८३८ हेक्टरची तफावत आहे. जिल्ह्यातील ७४ हजार ६३३ शेतकरी खातेदारांनी ई-पीकपाहणी केली असून ४ लाख ८६ हजार ९८६ शेतकरी खातेदारांची ई पीक पाहणी राहिली आहे. ई-पीकपाहणी बाबत अनेक शेतकरी उदासीन असल्यामुळे संपूर्ण पेरणी क्षेत्राची ई-पीकपाहणी पूर्ण होऊ शकलेली नाही.
परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांत एकूण ५ लाख ६१ हजार ६१९ शेतकरी खातेदार आहेत.त्यांच्या शेती खात्यांचे एकूण क्षेत्रफळ ६ लाख ७ हजार ५५५.८७ हेक्टर आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर आहे.यंदाच्या अंतिम पेरणी क्षेत्रानुसार २ लाख ९१ हजार ३३१ हेक्टरवर (१०७.५८ टक्के) पेरणी झाली आहे.
ई पीक अॅपद्वारे जिल्ह्यातील ७४ हजार ६३३ शेतकऱ्यांनी रब्बीतील १ लाख ४९ हजार ४९३ हेक्टरवरील पीक पेऱ्याची नोंद केली आहे. रब्बीच्या पेरणी क्षेत्रास अनुसरून येणारी ई-पीकपाहणी क्षेत्राची टक्केवारी ५१.३१ टक्के एवढी आहे.शेती खात्यांच्या क्षेत्रास अनुसरून येणारी ई-पीकपाहणीची टक्केवारी २४.६१ टक्के आहे. पीकविमा भरपाई आदी बाबींसाठी पाहणी करणे आवश्यक आहे. परंतु अनेक भागांत इंटरनेट कनेक्टिव्हिटी अभावी ई-पीकपाहणी करणे संबंधित शेतकऱ्यांना अशक्य होत आहे.
परभणी जिल्हा २०२३-२४ रब्बी हंगामा ई पीक पाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका शेती खाते संख्या एकूण
क्षेत्र रब्बी पेरणी क्षेत्र ई-पीक पाहणी क्षेत्र ई पीक पाहणी शेतकरी संख्या
परभणी १०००५३ १०९९०४ ५६७८२ ९६५६६ २२९२४
जिंतूर ९३०८० ११९१५७ ६४२७२ १३१७८ ९८४२
सेलू ६१८९१ .६८६०३ २६१०१ १०६०१ ७७२९
मानवत ४०६४४ ४८१३४ २१०७२ ५७४७ ४८४९
पाथरी ४५८६५ ५२९३३ १९०३९ ५०४५ ३७७२
सोनपेठ ३३३२४ ३६९५३ .१४३७१ ३८६५ ३४३९
गंगाखेड ७४०७४ ६३१४३ २९०८७ ४६७८ १३५०५
पालम ४९१७८ ४७९६७ २११५० ४०४३ ३४७३
पूर्णा ६३५१० ६०७५९ ३९४५७ ५७६६ ५१००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.