E Peek Pahani : खरिपातील ४ लाख २२ हजांरावर हेक्टरची ई-पीक पेरा नोंदणी

Kharif Season 2023 : यंदाच्या (२०२३) खरिपातील अंतिम पेरणी क्षेत्र ५ लाख १७ हजार ३०८ हेक्टर व ई पीक पाहणी क्षेत्र यांच्यामध्ये ९४ हजार ९०४ हेक्टरचा फरक आहे.
E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यात या वर्षी (२०२३) खरीप हंगामात सोमवार (ता. १६) पर्यंत ३ लाख ३८ हजार २२२ शेतकरी खातेदारांनी (६०.६७ टक्के) एकूण ४ लाख २२ हजार ४०४ हेक्टरवरील (६९.५२ टक्के) क्षेत्रातील ई-पीकपेरा नोंदणी (पाहणी) केली आहे. आता तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणी केली जात आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या (२०२३) खरिपातील अंतिम पेरणी क्षेत्र ५ लाख १७ हजार ३०८ हेक्टर व ई पीक पाहणी क्षेत्र यांच्यामध्ये ९४ हजार ९०४ हेक्टरचा फरक आहे. अजून २ लाख १९ हजार २३७ शेतकरी खातेदारांची ई-पीक करायची राहीली आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : खानदेशात रब्बीसाठी ई-पीकपाहणी बंद

जिल्ह्यातील शेती खात्यांचे एकूण क्षेत्र ६ लाख ७ हजार ५६६ हेक्टर आहे. एकूण शेतकरी खातेदारांची संख्या ५ लाख ५७ हजार ४५९ आहे. यंदा जिल्ह्यात पावसाच्या आगमनानुसार झालेल्या पेरण्या जुलैच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत रखडल्या होत्या.

E Peek Pahani
E Peek Pahani : लोहारा तालुक्यात ७८ टक्के ई-पीकपाहणी

त्यामुळे ई-पीक पेरा नोंदणीस उशिरा झाला. ई-पीक अॅपच्या वापराबाबत कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाने पुरेशी जागृती न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे महत्त्व अजून समजलेले नाही.

परभणी जिल्हा ई पीक पाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका एकूण शेतकरी खातेदार एकूण क्षेत्र पीक पाहणी खातेदार पीक पाहणी क्षेत्र

परभणी ९८६६७ १०९८९० ५५०२९ ७३२२६

जिंतूर ९२७९० ११९१६८ ५२९२८ ७७४६४

सेलू ६१३०७ ६८६०३ ३८६०८ ४९४२५

मानवत ४०३४४ ४८१३६ २५६०३ ३४५०६

पाथरी ४५६१५ ५२९३३ ३३४३२ ४१२६५

सोनपेठ ३३२३४ ३६९५२ .२३६०५ २८५९२

गंगाखेड ७३५८७ ६३१५४ ३५९६६ ४०४२०

पालम ४८९१५ ४७९६८ ३२०३६ ३३४१०

पूर्णा ६३००० ६०७५९ ४१०१६ ४४०९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com