Jowar Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Sowing : खानदेशात कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी निसवली

Rabi Season : खानदेशात रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी काहीशी कमी आहे. परंतु तापी, अनेर, पांझरा, गिरणा आदी नद्यांच्या क्षेत्रातील पीक निसवले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी काहीशी कमी आहे. परंतु तापी, अनेर, पांझरा, गिरणा आदी नद्यांच्या क्षेत्रातील पीक निसवले आहे. कोरडवाहू दादर ज्वारीही जोमात असून, कोवळ्या दाण्यांवर पक्षी हल्ला चढवत असल्याने शेतकरी ज्वारी राखण्याच्या लगबगीत आहे.

खानदेशात यंदा सुमारे ३९ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. ही पेरणी मका पिकापेक्षा अधिक आहे. कारण ज्वारीचे दर टिकून होते. तसेच पुढे चाऱ्याची समस्या तयार होईल, यासाठी ज्वारीच्या चाऱ्यासही मोठी मागणी राहील. यामुळे अनेकांनी मका व इतर पिकांची लागवड, पेरणी कमी करून ज्वारीची पेरणी केली आहे.

कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. परंतु पेरणीत मोठी घट झालेली नाही. अनेक ठिकाणच्या शेतात रब्बी हंगामातील मुख्य ज्वारीचे पीक आता दुल्ल्यात आले आहे. तालुक्यातील बळीराजा या पिकाचे पाखरांपासून संरक्षण करण्यात व्यस्त राहात आहे.

बांधावरून पाखरे हाकली जात आहेत. पाखरे हाकण्यासाठी वापरली जाणारी गोफण फारशी दिसत नसली तरी सध्या ती शेतकऱ्यांच्या हातात दिसत आहे. या तालुक्याच्या शेतशिवारात ‘सोन्याचं घुंगरू गोफणीला, ज्वारीचं पीक आलंय राखणीला’ असेच वातावरण आहे. पेरणी केलेल्या ज्वारी पिकाच्या कणसात दाणा भरू लागला असून, पाखरांनाही खाण्याची कमतरता असल्याने ज्वारी पिकावर भरपूर प्रमाणात पाखरे येऊ लागल्याने शेतकरी या पिकाची राखण करताना दिसून येत आहे.

पूर्वी प्रत्येक गावाच्या आठवडा बाजारात गोफण विक्रीस येत होती, परंतु आता ती दुर्मीळ आली आहे. कारण ज्वारीचे पीक कमी झाले आहे. पर्यायाने गोफणीची मागणी कमी राहात आहे. त्यामुळे गोफणी मोठ्या प्रमाणात तयार देखील केल्या जात नाहीत हे विशेष. कमी खर्च व अधिक नफा देणारे पीक म्हणून अनेक शेतकरी ज्वारी पीक घेत आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा या भागांत ज्वारी पीक अधिक आहे. भडगावातील खेडगाव व लगत ज्वारीचे मोठे क्षेत्र आहे. धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा व धुळे तालुक्यांत ज्वारी पीक असून, नंदुरबारात शहादा, तळोदा, नंदुरबार भागात ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी झाल्याची माहिती मिळाली.

दुष्काळी भागात पेरणी कमी

अनेक मंडळांत दुष्काळी परिस्थिती असल्याने पाऊस वेळेवर न पडल्याने यावर्षी ज्वारीची पेरणी कमी झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत काही शेतक-यांनी ज्वारीचे पीक मोठ्या कष्टाने जोपासले असून या पिकात दाणा भरू लागला आहे. परिसरात पाखरांना खाण्यासाठी काही नसत्याने या शेतकऱ्यास पाखरांची राखण करावी लागत असून, ज्वारीच्या पिकात माचवा करून त्यावर उभारून राखण करण्याचे चित्र आता दुर्मीळ झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवगा भाव नरमले; सोयाबीन स्थिरावले, कापसात चढ उतार, केळीचे दर टिकून तर गवार तेजीतच

PM Kisan Yojana: अर्थसंकल्पात 'पीएम किसान'साठी किती तरतूद?; २२ वा हप्ता 'या' तारखेला मिळू शकतो

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांसाठी दिलासा! शासन फेरपडताळणी सुरू करणार

Ambeohol Dam Project Issue: आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे

Union Budget 2026: काजू, नारळावर भर; शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण नाही

SCROLL FOR NEXT