Amaravati News : चारा आणि धान्याची उपलब्धता त्यासोबतच बाजारात मिळणारा दर यामुळे अंजनगावसूर्जी तालुक्याच्या काही गावांतील शेतकऱ्यांनी पुन्हा ज्वारीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे यंदा खोडगाव आणि देवगाव या दोन गावांतच ज्वारी खालील क्षेत्र ६५ ते ७० एकरांवर पोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तर तालुक्यात २१५ एकरांवर लागवडी पोहोचणार आहे. आत्मा प्रकल्पातून ज्वारी लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हे क्षेत्र वाढीवर भर दिला आहे.
देवगाव (ता. अंजनगावसूर्जी) हा परिसर पूर्वीपासूनच ज्वारी लागवडीसाठी प्रसिद्ध होता. परंतु गेल्या काही वर्षांत खरीप हंगामात अतिवृष्टी, पावसाचा खंड अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील ज्वारी क्षेत्र कमी केले.
आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी या भागात पुन्हा ज्वारी लागवड वाढावी यासाठी अनुदानात्मक योजना राबविण्याचा निर्णय घेतला. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना प्रती एकरी एक हजार रुपये अनुदान डिबीटीद्वारे देण्यात आले. शेतकऱ्यांना याद्वारे दोन एकरातून ४५ क्विंटलची उत्पादकता झाली.
अंजनगावसूर्जी बाजार समितीत ज्वारी तीन हजार रुपये क्विंटल तर काही शेतकऱ्यांची ३५०० रुपये क्विंटलने विकल्या गेली. काही शेतकऱ्यांनी ग्राहकांना थेट विक्रीवरही भर दिला. देवगाव परिसरात पशुपालकांची संख्या अधिक आहे. या जनावरांना कडबा देखील उपलब्ध झाला. तसेच यंदा क्षेत्र वाढणार असल्याची माहिती अंजनगावचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र तराळे यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.