Safflower Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Safflower Cultivation : करडई लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

Team Agrowon

डॉ. शरद जाधव, डॉ. तानाजी वळकुंडे

Safflower Crop : करडई हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे आणि अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक आहे. करडईची सोटमुळे जमिनीत खोलवर जातात. जास्त खोलीवरील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतात.

करडई पिकाचे विशेष महत्त्व
करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलापेक्षा बरेच कमी आहे. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा प्रमाणाबाहेर वाढत नाही. हृदयरोग्यांसाठी हे तेल उपयोगी आहे. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाच्या कार्यक्षमतेवर करडईच्या पाकळ्यांचा चांगला परिणाम होतो.

रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा तसेच रक्तामध्ये प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढून रक्त वाहिन्यात गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. मणक्याचे विकार, मानदुखी, पाठदुखी इ. वर करडई पाकळ्या व त्याचा काढा अन्य आयुर्वेदिक औषधांसोबत उपयोगी ठरतो.

जमीन ः
करडई पिकाच्या लागवडीस मध्यम ते भारी (खोल) जमिनीची निवड करावी. ४५ सें.मी.पेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. पाणी साठून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते.

पूर्वमशागत ः
भारी जमिनीत तीन वर्षांतून एकदा खोल नांगरट करावी व हेक्‍टरी ५ टन शेणखत टाकावे. दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुधारित वाण ः
अ.क्र. --- सरळ वाण --- कालावधी (दिवस) --- उत्पादन (क्विं./हे.) --- विशेष गुणधर्म
सरळ वाण
१. --- भीमा --- १३० - १३५ --- १३ - १५ --- कोरडवाहू क्षेत्रास योग्य
२. --- फुले – कुसुमा --- १३५ – १४० --- १४ - १६ --- कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखाली योग्य
३. --- एस.एस.एफ. ६५८ --- ११५ – १२० --- १२ - १३ --- बिगर काटेरी, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी योग्य.
४. --- एस.एस.एफ. ७०८ --- ११५ – १२० --- कोरडवाहू १३-१५ बागायती २०-२२ --- पश्‍चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य कोरडवाहू तसेच बागायती.
५. --- फुले करडई- ७३३ --- १२० - १२५ --- १३ – १५ --- कोरडवाहू लागवडीसाठी
६. --- फुले चंद्रभागा (एस.एस.एफ.७४८) --- १३०-१४० --- कोरडवाहू १३-१५ बागायती २०-२२ कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
७. --- फुले नीरा (एस.एस.एफ.१२-४०) --- १२० - १२५ --- कोरडवाहू १३-१५ बागायती २०-२२ --- तेलाचे प्रमाण अधिक(३२.९ टक्के) , अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी.
८ --- फुले भिवरा (एस.एस.एफ.१३-७१) --- १२० - १२५ --- कोरडवाहू १५-१६ बागायती २२-२५ --- अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य, मर रोग व मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
९. --- फुले गोल्ड (एस.एस.एफ.१५-६५) --- १२० - १२५ --- कोरडवाहू १५-१७, बागायती २०-२२ --- तेलाचे प्रमाण अधिक (३४.६ टक्के), भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी.
१०. --- फुले किरण (एस.एस.एफ.१६-०२) --- १२५ – १३० --- कोरडवाहू १५-१७ बागायती २०-२५ --- तेलाचे प्रमाण ३०.५% , अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी.
११. --- पी.बी.एन.एस. १२ --- १३५ – १३७ --- १२ - १५ --- अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य, मावा किडीस मध्यम प्रतिकारक.

पेरणीची वेळ ः
कोरडवाहू करडईची पेरणी ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करण्याची शिफारस आहे. बागायती पेरणी ऑक्टोबरअखेरपर्यंत करू शकतो. उशिरा पेरणी केल्यास (ऑक्टोबरचा दुसऱ्या आठवड्यानंतर) पीकवाढीची अवस्था थंडीच्या काळात येते. या काळात माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट येते.

पेरणीचे अंतर ः
कोरडवाहू क्षेत्रात दोन ओळींतील अंतर ४५ से.मी. आणि दोन रोपांतील अंतर २० से.मी. ठेवावे.

बियाणे ः प्रति हेक्‍टरी १० ते १२ किलो बियाणे पुरेसे होते.

बीजप्रक्रिया ः
बियाण्यापासून तसेच जमिनीतून उद्‍भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी करडईच्या बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम अधिक पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाण्यास चोळावे. त्यामुळे अनुक्रमे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते.

आंतरपीक पद्धत ः
हरभरा + करडई (६:३) आणि जवस +करडई (४:२) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

रासायनिक खते ः
करडई हे पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. ५० किलो नत्र (११० किलो युरिया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्‍टरी देणे आवश्‍यक आहे. ही खते पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत. बागायती करडई पिकास ७५ किलो नत्र (१६३ किलो युरिया) + ३७.५ किलो स्फुरद (२३५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्‍टरी द्यावे.

आंतरमशागत ः
उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी या पिकाची विरळणी करावी. विरळणी करताना चांगली जोमदार रोपे ठेवावीत. दोन रोपांमधील अंतर २० से.मी. ठेवावे. रब्बी हंगामात गरज असल्यास एखादी खुरपणी करावी. दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन घ्याव्यात.

पहिली कोळपणी तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दुसरी कोळपणी ५ व्या आठवड्यात अखंड पासेच्या कोळप्याने व तिसरी कोळपणी ८ व्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी.

पाणी व्यवस्थापन ः
करडई पिकाच्या वाढीस कमी पाणी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. कालांतराने ओलावा कमी झाला आणि पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी जमिनीस तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे अधिक चांगले.

दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. पिकास पाण्याचा जास्त ताण पडू देऊ नये. तसेच भेगा पडल्यानंतर पाणी दिले असता पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरते. जास्त पाण्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात मर रोगास बळी पडते. म्हणून करडई पिकास हलके पाणी द्यावे.


डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९०
(कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Birsa Munda anudan Scheme : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून मिळणार बैलगाडी, ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी अनुदान; जुन्या निकषांतही बदल

Soybean Procurement : ई-समृद्धी पोर्टलवर सोयाबीन खरेदीची नोंदणी शेतकऱ्यांनी की खरेदी केंद्रांनी करायची?

Tur Stock Limit : तूर, हरभऱ्यावरचे स्टाॅक लिमिट काढले; नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा

Amravati Zila Parishad : अमरावती जिल्हा परिषदेत विधानसभा च्या तोंडावर, अधिकाऱ्यांची कमतरता

Crop Insurance Compensation : विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

SCROLL FOR NEXT