Safflower Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Safflower Cultivation : सुधारित पद्धतीने करडई लागवड

Safflower Farming : करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामात पीक उत्पादकता वाढविण्यासाठी करडई पिकाची लागवड फायदेशीर ठरते.

Team Agrowon

डॉ.आदिनाथ ताकटे, डॉ. शुभांगी पाटील

Safflower Management : करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामात पीक उत्पादकता वाढविण्यासाठी करडई पिकाची लागवड फायदेशीर ठरते. करडई लागवडीसाठी मध्यम ते भारी (खोल), पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. साधारण ४५ सेंमीपेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते. पाणी साचून राहिल्यास करडई पिकास अपाय होतो.

पेरणी कालावधी

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पेरणी पूर्ण करावी. बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.

वाण

एसएसएफ ७०८, फुले करडई, फुले चंद्रभागा, फुले भिवरा ,फुले निरा फुले गोल्ड, फुले किरण.

बिगर काटेरी वाण

एसएसएफ ६५८, नारी-६, नारी एन एच -१

बीजप्रक्रिया

प्रति १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया केल्यास हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते.

पेरणी अंतर

४५ बाय २० सेंमी

बियाणे प्रमाण

हेक्टरी १० ते १२ किलो

खत व्यवस्थापन

हेक्टरी ५० किलो नत्र व २५ किलो स्फुरद द्यावे. म्हणजेच २.५ गोण्या युरिया, ३ गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी एकाच हप्त्यात दोन चाड्याच्या पाभरीने द्यावे.

डॉ.आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT