Safflower Cultivation : जिरायती क्षेत्रासाठी करडई पीक उत्तम पर्याय

Team Agrowon

करडई पिकाची मुळे जमिनीत तीन फुटांपेक्षा जास्त खोलवर जातात. त्या परिसरातील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतात.

Safflower Cultivation | Agrowon

अवर्षणप्रवण आणि कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे तग धरू शकते.

Safflower Cultivation | Agrowon

करडईची पानांची पूर्ण वाढ होतेवेळी मेणाचा थर असतो. त्याला कडेने काटे येतात. परिणामी झाडातील पाण्याचे बाष्पोत्सर्जन कमी होते. त्यामुळे करडई हे पीक जिरायती आणि अवर्षणप्रवण भागातही बऱ्यापैकी चांगले उत्पादन देऊ शकते.

Safflower Cultivation | Agrowon

करडई पिकास जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पाण्याची गरज भासत नाही.

Safflower Cultivation | Agrowon

फारच टंचाईच्या काळात पिकास एक ते दोन पाणीही पुरेसे होतात. म्हणजे पाणी कमी असल्यास एक एकर गव्हाच्या पिकाऐवजी आपण दोन-तीन एकर करडई घेऊ शकतो.

Safflower Cultivation | Agrowon

रब्बीमध्ये वारंवार गहू पीक घेतल्यामुळे जमिनीच्या फक्त वरील थरातील अन्नद्रव्ये वापरली जातात. मुळे खोलवर जाणारे करडईसारखे पीक उत्तम पर्याय आहे.

Safflower Cultivation | Agrowon

पाणी साचून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते.

Safflower Cultivation | Agrowon
आणखी पाहा...