Orange Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Varieties : संत्रा आणि मोसंबीच्या दर्जेदार १७ वाणांची आयात; फळबागांना नवी दिशा

Citrus Import : लिंबूवर्गीय फळांची गुणवत्ता आणि उत्पादनवाढीला चालना देण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने संत्रा, मोसंबी पिकाच्या उच्च दर्जा असणाऱ्या १७ वाणांची आयात केली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : लिंबूवर्गीय फळांची गुणवत्ता आणि उत्पादनवाढीला चालना देण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने संत्रा, मोसंबी पिकाच्या उच्च दर्जा असणाऱ्या १७ वाणांची आयात केली आहे.

‘सीसीआरआय’ने अमेरिकेतील नॅशनल क्‍लोनल जर्मप्लाजम रिपॉसिटरी फॉर सीट्रस (रिव्हर साइड, कॅलिफोर्निया) येथून १७ वाणांची आयात केली आहे. यामध्ये सहा मोसंबी (बाहिनिना, फ्रॉस्ट, लीमा, मिडनाइट, ऑलिंम्पिक गोल्ड, सलुस्टियाना) तसेच तीन संत्रा (पिक्‍सी, शास्ता गोल्ड आणि तोहो गोल्ड) वाणांचा समावेश आहे.

याचबरोबरीने लिंबूवर्गीय फळांपैकी ऑस्ट्रेलियन फिंगर लाइम (मायक्रोसीट्रस ऑस्ट्रेलिसिका) पोमेला हायब्रीड (कॉकटेल), टॅंगर (किंग), टॅन्जेलो (मिनीओला) आणि चार खुंट प्रजातींचा (फ्लाइंग ड्रॅगन, यूएस ८१२, सी-३५ आणि ट्रॉयर) यामध्ये समावेश आहे. हे वाण भारतातील लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात क्रांती घडवतील, असा दावा ‘सीसीआरआय’मधील तज्ज्ञांनी केला आहे.

‘सीसीआरआय’चे संचालक डॉ. दिलीप घोष तसेच नॅशनल क्‍लोनल जर्मप्लाजम रिपॉसिटरी फॉर सीट्रस या संस्थेचे संचालक डॉ. रॉबर्ट क्रुगर आणि वनस्पती रोगतज्ज्ञ डॉ. के. एल. मंजुनाथ यांच्या समन्वयातून हे वाण विनामूल्य उपलब्ध झाले आहेत. ‘सीसीआरआय’ने यापूर्वीच लिंबूवर्गीय पिकांचे खुंटासह ३३ वाण आयात करण्याची परवानगी घेतली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १७ वाण उपलब्ध झाले आहेत. उर्वरित वाणांची आयात पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती ‘सीसीआरआय’च्या सूत्रांनी दिली.

सह्याद्री फार्मकडून १४ वाणांची आयात

नाशिक येथील सह्याद्री फार्मकडून यापूर्वी लिंबूवर्गीय १४ वाणांची आयात करण्यात आली आहे. दोन वर्षांपासून या वाणांची विविध भागात लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये काही रॉयल्टी असलेल्या वाणांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

Interview with Dr. Suhas Diwase: राज्यातील जमीन मोजणी जलद आणि पारदर्शक होणार

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

SCROLL FOR NEXT