Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : औसा तालुक्यात पावसाचा असमतोल

Rain Alert : औसा तालुका परिसरात पावसाच्या असमतोलपणामुळे काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पेरणी खोळंबली आहे, तर बहुतांशी भागांत पिकाचे आयुष्य तुरळक पावसावर अवलंबून आहे.

Team Agrowon

Ausa News : औसा तालुका परिसरात पावसाच्या असमतोलपणामुळे काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पेरणी खोळंबली आहे, तर बहुतांशी भागांत पिकाचे आयुष्य तुरळक पावसावर अवलंबून आहे. पिकांच्या ऐन फुलोऱ्याच्या हंगामात कमी-जास्त पावसामुळे मालाच्या उताऱ्यावर परिणाम होण्याचा अंदाज आहे.

बऱ्याच वर्षांनंतर तालुका परिसरातील शेतकऱ्यांना मृगाची पेर सापडली. यामुळे मागील पाच-सात वर्षांपासून घटलेले उडीद, मुगाची पेर सापडली. या नक्षत्रातील पेरणीमुळे पिके रोगराईत सापडत नाहीत. मालाचा उतारा चांगला मिळतो. पुढील रब्बीची पेर वेळेवर होते. वर्षातून दुहेरी उत्पादनाचा लाभ मिळतो. कीटकनाशके, बुरशीनाशके याचा खर्च वाचतो. मृग नक्षत्राच्या दमदार पावसानंतर पावसाने अनियमितता सुरू केली.

तालुक्यातील पश्चिम-उत्तर भागातील औसा, आलमला, तावरजा नदीकाठचा परिसर शिवाय उजनीकडील नदीकाठचा परिसर अशा काही मोजक्या ठिकाणी दोन-तीन मोठे पाऊस झाल्याने त्या भागातील बांधाजवळील जमिनीमधील पाण्याचा निचरा न झाल्याने पेरण्या झाल्या नाहीत. पश्चिम-दक्षिण भागातील नागरसोगा, दापेगाव जवळगा (पो.) लिंबाळा, गुबाळ या परिसरात तुरळक पावसामुळे पिके तग धरून आहेत.

शिवनी, शिवनी वाडी, लामजना, कारला, मोगरगा, तांबरवाडी या परिसरात विहिरीला बोअरला पाणी असलेले काही शेतकरी ठिबक सिंचनाचे पाणी देत आहेत. या पावसामुळे विहिर-बोअरवेलला पाणी वाढले नाही. जायफळ, आंदोरा, भेटा, वडजी या परिसरात पावसाअभावी पिकाखालील जमिनीला भेगा पडत आहेत.

दमदार पावसाची गरज

याकरिता दमदार पावसाची गरज असल्याचे लिंबाळादाऊचे शेतकरी शौकत मिया, मोगरग्याचे किरण सोनवणे, नागरसोगाचे रमेश शिंदे, तावशीचे (ताड) संजय पवार, आलमलाचे रविशंकर बिराजदार, एरंडीचे शामराव जाधव यांनी सांगितले.

मालाच्या उताऱ्यावर परिणाम होणार

तालुक्यातील १३० गाव शिवारातील परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सारखी आहे. अनेक ठिकाणी कोळपणी, खुरपणी, फवारण्या झाल्या आहे. मात्र, हा काळ फुले लागण्याचा आहे. या अवस्थेत जास्त पाणी झाले, तर पिके पिवळी पडतात. तसेच, कमी पाणी झाले तर पिकाची वाढ खुंटून फुले गळतात. त्यामुळे उताऱ्यावर परिणाम होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

Monsoon Forecast : पावसाचे अंदाज चुकले का? Weather Model आणि Synoptic Features मधला फरक समजून घ्या

Rural Power Supply Issue: महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या; सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा

SCROLL FOR NEXT