Monsoon Forecast : पावसाचे अंदाज चुकले का? Weather Model आणि Synoptic Features मधला फरक समजून घ्या

नमस्कार शेतकरी मित्रांनो! सप्टेंबरच्या मध्यात राज्यात जोरदार पाऊस होईल, मुसळधार पाऊस पडेल, नदी-नाले वाहतील, अशा चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या. मात्र, अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. मग पावसाच्या अंदाजात नेमकं काय चुकलं?या विशेष मुलाखतीत हवामान तज्ज्ञांनी हवामान प्रारूप आणि वातावरणीय स्थिती यातील महत्त्वाचा फरक स्पष्ट केला आहे. केवळ हवामान प्रारूपात एखादी पावसाची प्रणाली दिसते म्हणून प्रत्यक्षात त्याच तीव्रतेचा पाऊस पडेलच असे नाही.वातावरणीय स्थिती म्हणजे नेमकं काय? हवामानाचा अंदाज घेण्यासाठी या स्थितीचा अभ्यास कसा केला जातो? आणि हवामान तज्ज्ञांचा अभ्यास व अनुभव का महत्त्वाचा ठरतो?याची सविस्तर माहिती जाणून घेऊया या विशेष मुलाखतीत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com