Agriculture News : कुंभार पिंपळगाव, जि. जालना गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीपातील सोयाबीनचे पीक पाण्याअभावी करपून गेले आहे. पाऊस येण्याची आशा मावळल्याने मूर्ती (ता. घनसावंगी) येथील शेतकरी डॉ. मोहनराव सोळंके यांनी आपल्या शेतातील ४० एकर सोयाबीन पिकावर नांगर फिरवून पीक मोडून टाकले..पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली होती. रिमझिम पावसावर पीक उगवून वाढीस लागले. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पिकाने ऊन धरले. बघता बघता पाण्याअभावी सोयाबीनचे पीक करपून गेले. .Rainfall Deficit: सोयाबीन सलाइनवर; कपाशीची वाढ खुंटली.बियाणे, खत आणि फवारणीवर खर्च करून उभे केलेले पीक पावसाअभावी जळून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे..Rain Deficit: पावसाने ओढ दिल्याने कानशिवणीतील सोयाबीन संकटात.कष्टाने उभे केलेले पीक वाचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र, पावसाची आशा संपल्याने अखेर ४० एकर सोयाबीन पिकावर नांगर फिरविण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान, खरीपातील बहुतांश पिके पावसाअभावी हातची गेली आहेत. .ऊस, केळी आणि फळबागाही अखेरच्या घटका मोजत आहेत. प्रशासनाकडून अद्याप पंचनामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.