Sugarcane Farmers: राज्यातील ऊसगाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची हंगामपूर्व लगबग वाढली आहे. सोलापूर विभागातील ३५ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाइन प्रस्ताव दाखल करण्यास सुरुवात केली असून, परवाना मिळाल्यानंतर मोठ्या दैनंदिन गाळप क्षमतेचे कारखाने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस मिळविण्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ऊस पळवापळवीची स्पर्धा रंगण्याची शक्यता साखर वर्तुळातून व्यक्त होत आहे..जिल्ह्यात यंदा सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या घटलेल्या पातळीमुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष गाळपासाठी उपलब्ध होणारा ऊस तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. विशेषतः मोठ्या क्षमतेच्या कारखान्यांना सुरुवातीच्या टप्प्यात पुरेसा ऊस मिळविण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेरही धाव घ्यावी लागू शकते..Interview with Dr Sanjay Kolte: साखर उद्योग बळकट करण्यासाठी प्रयत्न.साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या ‘ऑनलाइन क्रशिंग लायसन्स’ प्रणालीवर गाळप परवान्यासाठी कारखान्यांना प्रस्ताव सादर करावा लागत आहे. सोलापूर विभागातील ३५ कारखान्यांनी ऑनलाइन प्रस्ताव भरण्यास सुरुवात केली आहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून परिपूर्ण प्रस्तावांना साखर आयुक्तांची मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने गाळप परवाने वितरित केले जाणार आहेत..जिल्ह्यात पावसाअभावी उसाची वाढ खुंटली असून, विहिरी आणि बोअरमधील पाणीपातळीतही घट झाली आहे. त्याचा परिणाम यंदाच्या गाळप हंगामावर होण्याची शक्यता आहे. त्यातच सोलापूरसह राज्यात खोडव्याचे प्रमाण सुमारे ६० टक्के असल्याने साखर उताऱ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हंगामाचा प्रत्यक्ष वेग कारखान्यांची हंगामपूर्व तयारी, ऊसतोडणी मजुरांची उपलब्धता, वाहतूक व्यवस्था आणि उसाच्या पक्वतेनुसार होणारी तोडणी यावर अवलंबून राहणार आहे..Rangeland Restoration: माळरानांच्या पुनर्स्थापनेची गरज व दिशा .‘१५ ऑक्टोबर’ला ‘स्वाभिमानी’चा विरोधस्वाभिमानी शेतकरी संघटनेने १५ ऑक्टोबरपासून ऊसगाळप सुरू करण्यास विरोध केला आहे. संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली असून, लवकर गाळप सुरू केल्याने शेतकरी, कारखाने आणि ऊसतोड मजुरांवर होणाऱ्या परिणामांबाबत ते भूमिका मांडत आहेत..कृषी विभागाच्या अहवालाकडे लक्षमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत राज्यातील ऊस उपलब्धतेचा फेरआढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात यंदा १५.४८ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा असून, त्यातून सुमारे १२५० लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा प्राथमिक अंदाज साखर आयुक्तालय आणि सामंजस्य करार झालेल्या मिटकॉन संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, साखर कारखानदारांनी या आकडेवारीवर आक्षेप घेतल्याने प्रत्यक्ष शेतशिवारातील परिस्थिती तपासण्यासाठी फेरआढावा घेण्यात येत आहे. त्याचा अहवाल बुधवार (ता. २३) पर्यंत अपेक्षित आहे. या अहवालानंतर राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्यक्ष ऊस उपलब्धतेचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.