Kharif Season : पावसाअभावी हंगामाच्या सुरुवातीलाच चिंता

Sowing Update : संपूर्ण जून महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने जुलै महिना सुरू होऊन सुद्धा पश्‍चिम विदर्भात काही भागात पेरण्या खोळंबलेल्या आहेत.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Akola News : संपूर्ण जून महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने जुलै महिना सुरू होऊन सुद्धा पश्‍चिम विदर्भात काही भागात पेरण्या खोळंबलेल्या आहेत. जेथे पेरणी झाली त्या ठिकाणी पावसाअभावी संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसमोर हे एक नवे संकट उभे ठाकल्याने चिंतेत भर पडलेली आहे.

या हंगामात जून महिन्यात अकोला जिल्ह्यात सरासरीच्या २० टक्क्यांपर्यंत तूट तयार झालेली आहे. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सरासरीइतका पाऊस झालेला असूनही बऱ्याच मंडलांमध्ये असमतोल पाऊस झालेला आहे. मंडलांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नसतानाही झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या.

Kharif Season
Kharif Sowing : जूनमधील असमतोल पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये अडथळे

आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात एक जुलैपर्यंत चार लाख ६१ हजार ६७५ हेक्टर, अकोल्यात १ लाख ७८ हजार ३८७ तर वाशीम जिल्ह्यात २ लाख ९० हजार हेक्टरवर पेरणी नोंद झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात लाखो हेक्टर क्षेत्रावर अद्याप पेरणी झालेली नाही.

Kharif Season
Kharif Sowing : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ८० टक्के पेरणी

पेरण्या लांबत असल्याने चिंता

जुलै सुरू होऊनही पावसाचा पत्ता नाही. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अशा स्थितीत शेतकरी पेरणीसाठी प्रतीक्षा करीत आहेत. प्रामुख्याने कोरडवाहू पट्ट्यातील शेतीत सध्या पेरणी झालेली नाही. जून महिना संपलेला असल्याने मूग, उडदाचे क्षेत्र यंदा कमालीचे घटले. आता या पिकांची लागवड टाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. १५ जुलैपर्यंत सोयाबीन, तूर, कपाशी या प्रमुख पिकांची लागवड होईल.

खरीप हंगामात साधारपणे पेरणीचा काळ ३० जूनपर्यंत राहतो. मात्र काळानुरूप आता हवामान बदलामुळे आठ ते १० जुलैपर्यंतही पेरण्या करता येतात. सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस यंदा झालेला नाही. एकाच गावाच्या दोन शिवारांत वेगवेगळा पाऊस झालेला आहे. तरीही ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झालेला असेल तर तेथे पेरणी करता येईल. पाऊस लांबला तर काही पिकांबाबत पुनर्विचार करावा लागेल. मात्र, कपाशी, सोयाबीन, तूर अशी प्रमुख पिके लावता येतील. बीबीएफ व इतर हवामान अनुकूल तंत्रज्ञानांचा वापर करणे अगत्याचे आहे.
डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com