Pune News : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी जोरदार आहे. खानदेशात काही दिवस खंड पडल्यानंतर पुन्हा जोर वाढला आहे. रविवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंत रायगडमधील कसू मंडलात उच्चांकी ३११.५ मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका, तर विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे.
मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार :
मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागांत जोरदार, तर पूर्व भागांत हलका पाऊस झाला. तर ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक ३१५ मिलिमीटर पाऊस झाला. पुणे जिल्ह्यांतील काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. प्रामुख्याने पश्चिम भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. लोणावळा, कार्ल्यांत सर्वाधिक २०९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सध्या ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. त्यामुळे पश्चिम भागातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात पावसाच्या मध्यम स्वरूपाचा सर कोसळत आहे. दुष्काळी तालुक्यात तुरळक पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी २१.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विश्रांतीनंतर सक्रिय झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली.
रविवारी (ता. १४) दुपारपर्यंत शहरासह परिसरात संततधार सुरूच होती. दुपारी दोन वाजेपर्यंत २१ बंधारे पाण्याखाली गेले होते. पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ १९ फुट ८ इंच इतकी होती. नगर, नाशिक, सोलापूर भागातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत. खानदेशात जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे कापूस, सोयाबीन पिकांना दिलासा मिळत आहे.
कोकणात अतिवृष्टीसदृश पाऊस :
मागील काही दिवसापासून कोकणात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. रविवारी सकाळपर्यंत कोकणातील अनेक मंडलात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत सर्वदूर धुव्वाधार पाऊस झाला आहे. तर वैतरणा, तानसा, विहार, तुलसी, भातसा, वैतरणा या धरण क्षेत्रात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
धरणांतील पाणी पातळी वेगाने वाढत आहे. रत्नागिरीतील जूनपासून नियमित सुरू झालेल्या पावसाच्या मुसळधारेने जिल्ह्यातील जलसंधारण आणि पाटबंधारे विभागाच्या एकूण ३ मध्यम ६५ धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. राजापूरमधील अर्जुना मध्यम प्रकल्पासह जिल्ह्यातील ३२ लघू प्रकल्पांमध्ये १०० टक्के, ७ धरणांमध्ये ७५ ते ९९ टक्के, १६ धरणांमध्ये ५० ते ७५ टक्के आणि १३ धरणांमध्ये ० ते ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.
मराठवाड्यात हलका पाऊस :
मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद, सोयगाव, नांदेडमधील हदगाव, भोकर, किनवट, माहूर या तालुक्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे खरिपातील पिकांना आधार मिळत आहे. पिकांची वाढ चांगली असल्याने शेतकरी सुखावले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंतरमशागतीच्या कामांवर भर दिला आहे. त्यामुळे शेताशेतात शेतकऱ्यांसह मजुरांची कामाची लगबग पाहायला मिळत आहे.
पूर्व विदर्भात जोरदार पाऊस :
विदर्भात पावसाचा जोर कमीअधिक आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. तर अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. तर गडचिरोली जिल्ह्यांतील देसाईगंज मंडलात सर्वाधिक १६८.३ मिलिमीटर तर शंकरपूर १२४.३, काढोली ७३.५, पिसेवढथा ७१, भंडाऱ्यातील विरली ब ९०.५, कोंढा ८४.८, चंद्रपुरातील बह्मपुरी, अन्हेर, चौगण ५७.८, गोंदियातील महागाव, केशोरी, गोथानगाव मंडलात ७१.८ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे धान पिकांना आधार मिळत आहे.
- घाटमाथ्यासह चार मंडलांत २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस.
- पश्चिम महाराष्ट्रातील धरणांतील पाणी पातळीत वेगाने वाढ.
- खानदेशात अनेक दिवसानंतर पावसाचा दिलासा.
- मराठवाडा, विदर्भातही हलका ते मध्यम पाऊस.
घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस, मिलिमीटरमध्ये :
भिरा २२७, डुंगरवाडी २६४, अंबोणे २२२, खोपोली २००, लोणावळा १९३, शिरगाव १८४, शिरोटा १३७, वळवण १७३, कोयना १५४.
येथे पडला १५० मिलिमीटरहून अधिक पाऊस :
जांभूळपाडा २१६, कार्ला, लोणावळा २०९.५, चौक २०२.८, अप्पर, टिटवाळा १९४.३, मुरबाड १८८.३, देहरी १५०.५, अंगाव १८९.५, डिघशी १५२, किनहवळी, वसींड, डोळखांब, शहापूर १५८.३, अलिबाग, पोयनाड, रामरज, चरी १९३, पवयंजे, मोराबी १८४.३, नेरळ १७५.५, खोपोली १५१.५, करंजवडी १५२.८, आंबवली १५५.३, आबलोली १५६.८, मंडणगड १५२, कामरली, पेण १९६.३, वाशी १९९.३, रत्नागिरी, खेडशी १६१, जयगड १५०.३, फसोप १६१, तरवल १५०.५, पाली १६१, कडवी १५३.८, भरणे १५४.३, वाडा १६६.३, कडूस १७२.३, कोणे १६६.३, कांचगड १९३.५, अडावद १५३.३,
रविवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटर (स्रोत ः कृषी विभाग)
कोकण : ठाणे १५१.३, बलकुम १३६.५, भाइंदर १३६.३, मुंब्रा १५१, दहिसर, बेलापूर ११६, अप्पर कल्याण ११६, ठाकुर्ली १३३.५, धसइ १२०.३, नयाहडी ११७, सरळगाव १२०.३, भिवंडी १३६.५, अप्पर भिवंडी १३३.५, खारबाव १३६.५, खर्डी १०५, उल्हासनगर, अंबरनाथ, कुमभर्ली ११९.८, गोरेगाव ९८, बदलापूर ९८, सरल १३५, चौल १३१.३, पनवेल १४२.८, ओवले, कर्नाळा १४४, तळोजे ११६, कर्जत १३४, कडाव १३३.५, कळंब १३६.५, कशेले १३३.५, वौशी १४४.५, पाली, आटोने ११८, महाड १३१., बिरवडी १४७.८, नाटे ११४, खारवली १३१., तुडली १११.८, माणगाव १०५, इंदापूर १०७.३, गोरेगाव ९७.५, लोणेरे १०९.३, निजामपूर १०७.३, रोहा १३४.५, नागोठणे १०८.३, चानेरा १२०.३, कोलाड १३७.३, पोलादपूर १००.५, कोंडवी ११९.८, वाकण १००.५, मुरूड १३२, नंदगाव १०२, बवरली १३१.३, म्हसला १२८.५, मेढा १३७.३, चिपळूण १०३, खेर्डी १३२, मार्गताम्हाणे, रामपूर १२३.५, वहाळ १४१.३, सावर्डे १३३.५, असुर्डे ११३.८, कळकवणे १०१, दापोली ११५.५, आंजर्ले १००, वाकवली १२८, पालगड १३९, वेळवी ११५.५, खेड १२८, शिर्शी १३५, कुळवंडी १४२.८, दाभीळ १३५, धामणंद १३२, हेदवी १३५, म्हाप्रळ, देव्हारे १०२.८, मुरडव ११९, माखजन १४२, फुंणगुस १२०.५, फणसवणे ११४.३, आंगवली, कोंडगाव ९६.३, देवळे ११४.५, तुळसानी ९६.८, माभळ १२०.५, तेर्ये ११४.३, कोंडये ११९.५, ओणी ११४, लांजा ११४, भांबेड ९८, पुनस १३१, विलवडे ११४, मीठबाव ९९, शिरगाव ११०.५, पाटगाव ११३.८, मसूरे १११.८, श्रावण १३८.८, पोइप १२२.३, बांदा ११२.३, आजगाव १२६.८, आबोली ९५.८, मडूरा १४७, शिरोडा १२६.३, कणकवली १२३.३, फोंडा ११०.५, नांदगाव ११७.३, तळेरे ११९.५, कडावल ११३, कसाल ११९, वैभववाडी ११८.८, येडगाव ९९.३, वसई १३५.५, मांडवी १२१, अगशी १२८.३, निर्मल १२१, विरार १२८.३, मानिकपूर १२१, डहाणू १०३, मालयण १०३, साइवन ११४.३, मनवर ११५.५, विक्रमगड १४४.८, तलवड ११४.३.
मध्य महाराष्ट्र : उंबरठाणा, सुरगाना ७८.८, नानशी ७०.५, इगतपुरी ८१.८, नवागाव ७३.३, चिंचपाडा ८२.५, विसरवाडी ८३.५, जळगाव ७८.५, असोदा ९९, पिंप्राळा ८२, नसिराबाद ११७.८, भोकर ८२.५,धानोरा ११८.३, माले, मुठे १०९.८, काले ९९.५, खडकाळा १०१.५, शिवणे ९०, वेल्हा १४७.८, पानशेत १३३, विंझर ७०.५, आंबेगाव १२५.८, परळी ८०, बामणोली ८०.३, हेळवाक १००, महाबळेश्वर १३२.५, लामज १२०.५, करंजफेन ७३.८, आंबा ११८.८, गगनबावडा ८६, कडगाव ७५.५,
विदर्भ : पाचखेडी ६५.३, असगाव ५२.३, सावर्ला ६२.३, लाखंदूर ४२, भागडी ४४.३, गंगाझारी ५१, मेंढा ५३.३, मिढाळा ५६.८, गडचिरोली ५२.८, पोरळा ५३.५, ब्राह्मणी ४५.३, कुरखेडा ६१.३, अरमोरी ५४, वैरागड ६४.५, धानोरा ५८.८.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.