Sugarcane Worker Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Workers : निरक्षर ऊसतोड कामगारांना मिळणार शिक्षणाचे धडे; साखर आयुक्तांचे आदेश

Sugarcane Workers Education : राज्यातील ९६ सहकारी व ९३ खासगी, अशा एकूण १८९ साखर कारखाना परिसरातील फडात ऊसतोडणी बरोबरच शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

sandeep Shirguppe

Sugar Commissioner Orders : राज्यात साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या कामगारांचे शिक्षण खंडीत होते. या कामगारांचे शिक्षण अंखडीत राहण्यासाठी साखर आयुक्त दीपक तावरे यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना एक आदेश काढला आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी कारखाना परिसरात त्यांच्यासाठी अध्ययन- अध्यापन वर्ग सुरू करावेत, असा आदेश साखर आयुक्त तावरे यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील ९६ सहकारी व ९३ खासगी, अशा एकूण १८९ साखर कारखाना परिसरातील फडात ऊसतोडणी बरोबरच शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

केंद्र पुरस्कृत 'उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम' राज्यात सन २०२२ ते २०२७ या कालावधीत सुरू आहे. यामध्ये वयोगट १५ व त्यापुढील वयोगटातील असाक्षरांसाठी प्रौढ शिक्षण ऐवजी 'सर्वांसाठी शिक्षण' या नावाने हा कार्यक्रम सुरू आहे. चालू शैक्षणिक वर्षात २४ डिसेंबर अखेरपर्यंत ४ लाख ९२ हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाल्याची माहिती साखर आयुक्त विभागाकडून मिळाली आहे.

कोल्हापूर शिक्षण मंडळाचे राज्य समन्वयक 'उल्लास' तथा विभागीय अध्यक्ष राजेश क्षिरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या योजनेत शाळा हे एकक असून, असाक्षर व त्यांना शिकवणाऱ्या स्वयंसेवकांची ऑनलाईन नोंदणी उल्लास मोबाईल अॅपवर शाळांनी नेमलेल्या सर्वेक्षकांद्वारे करण्यात येते. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात गावोगावी असे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हंगामाच्या साधारणपणे चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित ऊसतोड कामगार त्या ठिकाणी वास्तव्य करतात. ते ज्या क्षेत्रांतून स्थलांतरित झालेले आहेत, तेथील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांमार्फत संबंधित ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे". असे क्षिरसागर म्हणाले.

"यामध्ये आढळलेल्या असाक्षरांची 'उल्लास अॅप'वर नोंदणी व स्वयंसेवकांबरोबर ऑनलाईन जोडणी करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित असाक्षरांच्या उपलब्ध वेळेनुसार त्यांना स्वयंसेवकांमार्फत अध्ययन-अध्यापन करण्यात येत आहे. हंगाम सुरू असेपर्यंत अध्यापन वर्ग सुरू ठेवण्यात यावा. जेणेकरून संबंधितांच्या अध्ययनात खंड न पडता, त्यांच्या शिक्षणात सातत्य टिकून राहील. त्याचबरोबर काम संपल्यावर ते मूळ ठिकाणी परत गेल्यावर उल्लास परीक्षा देऊन उत्तीर्ण होतील". अशीही माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Subsidy : २०२३ च्या कांदा अनुदानासाठी २८ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

Hydrogen Fuel cooking: आता हायड्रोजन इंधनावर स्वयंपाक शक्य

Heavy Rain: दमदार पावसाने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी

Agriculture Success: तांत्रिक व्यवस्थापनातून फळबाग शेतीत समृद्धी

Dairy Business: दुग्ध व्यवसायाने पालटेल विदर्भाचे चित्र

SCROLL FOR NEXT