Agrowon Business Excellence Awards 2022
Agrowon Business Excellence Awards 2022  Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Business Excellence Awards 2022 : नवतंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी `आयआयएल’ कंपनी

Team Agrowon

कॉमर्समध्ये (Commerce) पदवी घेतल्यानंतर राजेश अग्रवाल यांनी मार्केटिंगमध्ये डिप्लोमा केला. राजेश अग्रवाल हे आज ‘क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया’चे उपाध्यक्ष आहेत. PMFAI च्या (Pesticides Manufacturers & Formulators Association of India) व्यवस्थापकीय समितीचे सदस्य, तसेच Insecticides (India) Limited चे (IIL) व्यवस्थापकीय संचालक आहेत. इन्सेक्टिसाइड (इंडिया) लिमिटेडने त्यांच्या नेतृत्वात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आज पीक संरक्षणाच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी जगभरात उल्लेखनीय ठरत आहे.

महत्त्वाकांक्षी आणि दृढनिश्चयी असलेले राजेश अग्रवाल यांनी २००६ मध्ये ‘आयआयएल’ चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी कंपनीला यशस्वीरीत्या नवीन उंचीवर नेले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या महसुलात अनेक पटींनी वाढ झाली. त्यांच्या भविष्यवादी दृष्टिकोनामुळे ही वाढीची कमान उंचावत आहे.

वास्तविक तीन पिढ्यांपासून सुरू असलेल्या कुटुंबाच्या जुन्या व्यवसायापासून दूर जात राजेश अग्रवाल आणि त्यांचे वडील हरिचंद अग्रवाल यांनी ‘आयआयएल’ ची स्थापना केली. कंपनीचे कामकाज २००१-२००२ मध्ये सुरू झाले. तेव्हा आर्थिक मंदीमुळे भारतातील कृषी रसायन क्षेत्र डबघाईला आले होते.

ज्या वेळी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या क्षेत्रात गुंतवणूक केली होती, अशा काळामध्ये ‘आयआयएल’चे (मॅन्युफॅक्चरिंग युनिट, भिवाडी, राजस्थान) येथे सुरू केले. जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अग्रवाल यांनी रात्रंदिवस काम केले. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात नंतर कधीही मागे वळून पाहलेले नाही. २००४ पर्यंत ‘आयआयएल’ चे स्वतःचे ३० पेक्षा जास्त ब्रँड तयार झाले होते आणि कंपनीचा ताळेबंदसुद्धा दुप्पट झाला होता. नावीन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून त्यांनी स्पर्धात्मक बाजारपेठेत मोठी घोडदौड केली. आर्थिक मंदीच्या काळातही कंपनीच्या प्रगतीची पताका फडकावली.

जागतिक दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या AMVAC, U.S.A. सोबत नुवान व थिमेटसाठी तांत्रिक सहकार्य करार केला. सन २०१३ मध्ये त्यांनी AMVAC केमिकल कॉर्पोरेशन यूएसए आणि जपानी कंपनी निसान केमिकल कॉर्पोरेशन यांच्याशी हातमिळवणी केली. पल्सर आणि हकामा यांसारखे काही आघाडीचे आंतरराष्ट्रीय ब्रँड जोडले.

‘आयआयएल’ ने वेगवेगळ्या प्रवाहात आणि तांत्रिक क्षेत्रात काम करणारी स्वतःची रिसर्च अँड डेव्हलपमेंट केंद्रांची स्थापन केली. २०१४ मध्ये राजेश अग्रवाल यांनी जपानी कंपनीसोबत रिसर्च अँड डेव्हलपमेंट केंद्राची स्थापना केली. आज त्यांच्या नेतृत्वात ‘आयआयएल’ कंपनी सार्वजनिक झाली आणि २००७ मध्ये BSE आणि NSE मध्ये सूचीबद्ध आहे.

आज IILची उत्पादन श्रेणी १०० पेक्षा जास्त फॉर्म्यूलेशन उत्पादने आणि १५ पेक्षा अधिक तांत्रिक ग्रेड उत्पादनांचे झालेले आहे. भारतीय कृषी-रसायनांमध्ये एक मजबूत कंपनी म्हणून आपले स्थान बनवले. IIL ने सन २०२२ आर्थिक वर्षात १४२८ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे, यातून घोडदौडीवर शिक्कामोर्तब होते.

IIL सध्या जगभरातील विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या उत्पादने पोहोचवण्यासाठी काम करीत आहे. कंपनीचे सध्या २२ देशांमध्ये निर्यात असून, पुढील वर्षी आणखी विस्तार करण्याच्या योजना आहेत.

कृषी रसायनांच्या जबाबदार वापराला प्रोत्साहन देत IIL शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचा नेहमीच दावा सुद्धा केला जातो. त्यामुळेच कंपनीचा संशोधन आणि विकास विभाग सातत्याने नवनवीन उत्पादनांच्या निर्मितीचे काम करीत असतो. वाढत्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह नवीन बाजारपेठा शोधण्याचेही काम सुरू आहे.

- प्रतिक मोरे ९४२२८४३३५२

- शिरीष रावेकर ९३७३१०९८८३

द्राक्ष उत्पादकांसाठी आशेचा किरण ठरले स्टनर बुरशीनाशक

इन्सेक्टिसाइड्‌स (इंडिया) लिमिटेडने द्राक्षांमध्ये डाउनी मिल्ड्यू या घातक ठरणाऱ्या रोगासाठी स्टनर हे बुरशीनाशक तयार केले. स्टनर हे द्राक्षांमध्ये डाऊनी मिल्ड्यू नावाच्या बुरशीजन्य रोगाविरुद्ध प्रभावी बुरशीनाशक ठरलेले आहे. इन्सेक्टिसाइड (इंडिया) लिमिटेडने डाऊनीचा सामना करण्यासाठी स्टनर तयार केले आहे.

बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांना हंगामात २० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान सोसावे लागते. डाऊनी हा द्राक्षांच्या गुणवत्तेवरही मोठा परिणाम करीत असतो. त्याविरुद्ध तयार केलेले स्टनर हे तंत्रज्ञान व फॉर्म्यूलेशन भारतात तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारण आजपर्यंत भारतीय द्राक्ष उत्पादक हा आयात केलेल्या बुरशीनाशकांवर अवलंबून होता.

तथापि, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमावर ठाम विश्‍वास असल्याने, कंपनीने हे पाऊल उचलले आणि द्राक्षांवरील डाऊनी मिल्ड्यूला रोखण्यासाठी भारतात प्रथमच एक प्रभावी बुरशीनाशक तयार झाले, असे इन्सेक्ट्साइडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

या बुरशीनाशकामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, बारामती, सांगली, नारायणगाव, सोलापूर, सातारासह इतर भागांतील द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी डाऊनीमुळे बागांचे प्रचंड नुकसान व्हायचे. आता स्टनर हे बुरशीच्या विरुद्ध वनस्पतीची संरक्षण यंत्रणा सक्रिय करते, असे कंपनीचे उपाध्यक्ष संजय वत्स म्हणाले.

शिनवा, इझुकी प्रभावी

IIL ने जपानच्या निसान केमिकल कॉर्पोरेशनसोबत दोन नवीन पीक संरक्षण उत्पादने शिनवा आणि इझुकी बाजारात सादर केले आहेत. शिनवा हे निसान केमिकल कॉर्पोरेशनने पेटंट केलेले कीटकनाशक आहे. थ्रीप्स आणि लेपिडोप्टेरन कीटकांवर नियंत्रण मिळवता येते. izuki हे निसान केमिकल कॉर्पोरेशनच्या तांत्रिक सहकार्याने विशेष बुरशीनाशक आहे.

हे बुरशीनाशक भाताचे (धान) ब्लास्ट आणि शीथ ब्लाइट रोगापासून संरक्षण करते. शिनवा उच्च आणि कमी तापमानात प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. हकामा, पल्सर, कुनोची आणि विशेषतः: गेल्या वर्षी लाँच झालेल्या हचिमन सारखी उत्पादने पाश्चिमात्य बाजारपेठेतही चांगली स्वीकारली गेली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT