Ajit Kumbhar Agrowon
ॲग्रो विशेष

District Development : निधी अखर्चित ठेवल्यास जबाबदारी निश्चित करणार

Ajit Kumbhar : जिल्हा वार्षिक योजनेत नियोजनानुसार विहित कालावधीत निधी खर्च होणे आवश्यक आहे. विकासकामांचा निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला.

Team Agrowon

Akola News : जिल्हा वार्षिक योजनेत नियोजनानुसार विहित कालावधीत निधी खर्च होणे आवश्यक आहे. विकासकामांचा निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला.

जिल्हा वार्षिक योजनांबाबतची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील व सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले, ‘‘विकासकामांवरील नियोजित निधी खर्च करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक आहे. अनेक विभागांकडून अद्यापही प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही पूर्ण झालेली नाही.

पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय विभाग अशा कृषिपूरक व्यवसायांशी संबंधित विभागांकडून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी चांगली विकासकामे व अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

तथापि, त्यानुसार मागणी प्राप्त झालेली नाही. कामांसाठी अद्यापही प्रशासकीय मान्यता न मिळवलेल्या विभागांनी दोन दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करावी व विकासकामांना चालना द्यावी.

ते पुढे म्हणाले, की ज्या विभागांकडून विहित वेळेत निधी पूर्णत: खर्च होणे शक्य नाही, त्यांनी तसे तत्काळ कळवावे जेणेकरून हा निधी अन्य आवश्यक विकासकामांकडे वळविता येईल. मात्र, ही कार्यवाही त्वरित व्हावी.

वेळेवर निधी अखर्चित राहिल्याचे आढळल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल. कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी उपयोजना व विशेष घटक निधीतून नियोजित कामांचाही आढावा त्यांनी घेतला.

मत्स्य, पशुसंवर्धनवर रोष

या बैठकीत प्रामुख्याने पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा दिला. कृषिपूरक व्यवसाय उभारणीत महत्त्वाची भूमिका असलेल्या या विभागाकडून अपेक्षित काम झालेले नाही. चांगली विकासकामे व अभिनव उपक्रम राबवण्यासाठी पुरेशी मागणी नसल्याने नाराजीही व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy: अमरावती जिल्ह्यात घरकुलांमध्ये मिळणार सौर ऊर्जेचा लाभ

Crop Insurance: सरासरी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Flaxseed Farming: धान उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची जवसाला पसंती

Summer Moong Crop: कमी कालावधीत येणारे उन्हाळी मुगाचे ९ वाण

Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी

SCROLL FOR NEXT