District Development Plan : नांदेडला ६३४ कोटींच्या आराखड्यास मान्यता

Girish Mahajan : नांदेडच्या ६३४.५२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास, तसेच जिल्हा विकास आराखड्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.
Girish Mahajan
Girish MahajanAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारण ४२६ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना १६३ कोटी व आदिवासी उपयोजना ४५.५२ कोटी असा एकूण ६३४.५२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास, तसेच जिल्हा विकास आराखड्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात आयोजित नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्हीसीद्वारे बैठकीस उपस्थिती दिली. या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे,

Girish Mahajan
District Development Plan : जिल्हा विकास आराखड्यासाठी सोमवारपर्यंत माहिती सादर करा

आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह विभाग प्रमुख हजर होते.

शासनाच्या पुढाकारातून नांदेड-बिदर या रेल्वे योजनेला मोठी गती मिळाली आहे. महाराष्ट्राने यासाठी साडेसातशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे आता नांदेड-वर्धा रेल्वेच्या उपलब्धतेनंतर विदर्भातून थेट बिदरपर्यंत मधला मार्ग विकसित होणार असल्याने याचा लाभ नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याला अधिक होणार आहे.

Girish Mahajan
District Development Plan : छत्रपती संभाजीनगर जिल्हा विकास आराखड्यासाठी कार्यकारी समितीची बैठक

मुखेडसारख्या कोरडवाहू क्षेत्रात जे काही तलाव होते ते गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे क्षतीग्रस्त झाले आहेत. काही तलाव फुटले आहेत. याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी आमदार तुषार राठोड यांनी केली.

पाणीपुरवठ्याच्या कामाबाबत तडजोड नको

‘हर घर नल से जल’ या योजनेद्वारे जिल्ह्यात १ हजार २३४ योजना जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहेत. ३० मोठ्या योजना महाराष्ट्रजीवन प्राधिकरण पूर्ण करीत आहे. जिल्हा परिषदेने आजवर २९९ योजना युद्धपातळीवर पूर्ण झाल्याबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित योजना शासनाच्या निकषानुसार तत्काळ पूर्ण करण्याबाबतची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी जिल्हा परिषदेला दिले. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com