Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पालखेडच्या पाण्याने पूर्व भागातील बंधारे न भरल्यास जलसमाधी घेऊ

Palkhed Irrigation : पालखेड कालव्याला आवर्तन सुरू झाले असून, त्यातून तालुक्यातील पूर्व भागासाठी वितरिका क्रमांक ४६ ते ५२ वरील सर्व बंधारे भरून द्यावेत.

Team Agrowon

Nashik News : पालखेड कालव्याला आवर्तन सुरू झाले असून, त्यातून तालुक्यातील पूर्व भागासाठी वितरिका क्रमांक ४६ ते ५२ वरील सर्व बंधारे भरून द्यावेत. दोनशे क्युसेकने दहा दिवस पाणी सोडल्यास परिसराची पाणीटंचाई मिटणार आहे. वितरिकांना पाणी न सोडल्यास जलसमाधी घेण्याचा निर्णय रास्ते सुरेगाव येथे शुक्रवारी (ता. १५) झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला.

अंदरसूल पूर्व गवंडगाव, रास्ते सुरेगाव, देवळाणे, खामगाव, देवठान परिसर पालखेड डावा कालवा वितरिका क्रमांक ४६ ते ५२ च्या अंतर्गत आहे. यंदा पावसाअभावी दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. विहिरीत पाणी शिल्लक नाही. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, अशा संकटांनी गावांना ग्रासले आहे.

पालखेड डावा कालव्याला येवला शहरासह मनमाड आणि ३८ गाव पाणीयोजना आणि शेती सिंचनासाठी आवर्तन सोडले आहे. आवर्तनातून चारी क्रमांक ४६ ते ५२ ला पाणी बंधारे भरण्यासाठी सोडावे, या मागणीसाठी रास्ते सुरेगाव येथे सहा गावातील ग्रामस्थांची बैठक झाली.

पाणी न सोडल्यास पालखेड डावा कालव्यात जलसमाधी घेण्याचा निर्धार करण्यात आला. शेती व पिण्यासाठी पालखेड डावा कालव्याला सोडलेल्या आवर्तनातून पाणी द्यावे, या मागणीचे निवेदन २८ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी, पालकमंत्री, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, तालुका पोलिस निरीक्षकांनी ग्रामस्थांनी दिले.

रस्ते सुरेगाव येथील सदगुरू लॉन्समध्ये शुक्रवारी सकाळी अकराला झालेल्या बैठकीत विजय पठाडे, शिवनाथ शेळके, वाल्मीक मगर, बाबासाहेब पवार, रामदास भागवत आदींनी मनोगत व्यक्त केले. नाना बोंबले, रामभाऊ डुमरे, हरिभाऊ साळुंखे, बाळासाहेब भागवत, अप्पासाहेब भागवत, देवा भागवत, गंगाराम भागवत, उत्तम चव्हाण, गणपत भोसले, अमोल ढमाले, नंदू जाधव, नारायण मुदगुल, अप्पासाहेब चिकणे, बाळासाहेब चिकने, भरत बोंबले, सुरेश बोंबले, साईनाथ बोंबले उपस्थित होते.

चारी क्रमांक ४६ ते ५२ ला पाणी सोडण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येणार असून, वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल.
-संभाजी पाटील, उपविभागीय अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT