Land  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition Compensation : मोबदल्यासाठी बुडित क्षेत्रात झोपड्या

Land Acquisition : एका गावात बुडित क्षेत्रामध्ये चालू वर्षी धरणाचे पाणी साठविण्यात येणार होते. परंतु भूसंपादनाचे काम मात्र काही कारणामुळे मागे रेंगाळले होते.

शेखर गायकवाड

Land Information : एका गावात बुडित क्षेत्रामध्ये चालू वर्षी धरणाचे पाणी साठविण्यात येणार होते. परंतु भूसंपादनाचे काम मात्र काही कारणामुळे मागे रेंगाळले होते. अजूनही भूसंपादन सुरू झाले नाही, हे पाहून गावातल्या एका माणसाने रात्रीतून एक छोटी झोपडी ३०० रुपयांत बनवून घेतली व सरकार दरबारी अर्ज करून माझ्या घराचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, असा कांगावा त्याने केला.

भूसंपादन करताना संयुक्त मोजणीच्या वेळी मोजमाप अधिकाऱ्याने चौकशी केल्यावर त्यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आली, की त्या वेळी ही झोपडी नव्हती. मोजमाप अधिकाऱ्याने गावातील लोकांबरोबर स्थानिक चौकशी केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले, की धरणाच्या बुडित क्षेत्रातील गावातील किमान ३०-४० लोकांनी अशाच पद्धतीने रेडिमेड झोपड्या शेतात आणून टाकल्याचे स्पष्ट झाले.

गावातील काही स्थानिक धरणग्रस्तांच्या नेत्यांनी तीन ते चार वेळा अशा घरांचा मोबदला मिळाला नसल्याबद्दल जिल्हा कचेरीवर मोर्चेदेखील काढल्याचे निदर्शनास आले. परंतु मोजमाप अधिकाऱ्यांच्या नंतर लक्षात आले, की मोर्चे वगैरे हे सगळे सरकारला फसविण्यासाठी केलेले एक सोंग होते आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या लोकांना गोळा करून हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले.

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे धरणाच्या बुडित क्षेत्रात तात्पुरत्या झोपड्या टाकून जास्त मोबदला रक्कम सरकारकडून मिळविण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे व याचा परिणाम खऱ्या धरणग्रस्तांवर अन्याय करणारा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT