Agriculture Land Loan : शर्तीच्या जमिनीवर काढता येते कर्ज

Loans against Agricultural Land : महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार नवीन शर्तीच्या जमिनीवर कर्ज काढायला कोणाच्याही पूर्वपरवानगीची गरज नाही.
Agriculture Land
Agriculture LandAgrowon
Published on
Updated on

Village Story : एका गावात रणजित नावाचा एक सैनिक राहत होता. रणजितला सरकारकडून कसण्यासाठी शेतजमीन मिळाली. या जमिनीवर ‘नवीन शर्त’ असा उल्लेख सरकारकडून करण्यात आला होता. त्यामुळे सैनिक रणजित घाबरला.

रणजितला ‘नवीन शर्त’ या शब्दाचा अर्थ काही समजत नव्हता. रणजित ने गावातील अनेक लोकांना या शब्दाचा अर्थ विचारला. गावातील काही लोकांनी रणजितला सांगितले की, ‘‘या शब्दाचा अर्थ असा आहे, की तुला ही जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता येणार नाही किंवा जमीन गहाणही ठेवता येणार नाही!’’

Agriculture Land
Land Acquisition : सरपंचासह १५८ कुटुंबे घेणार जलसमाधी

रणजितला वाटले या माळरान जमिनीत काहीही उगवत नाही अन् जमिनीत सुधारणासुद्धा करता येत नाही. फार विचार केल्यावर रणजितला वाटले, सरकारने जमीन दिली आहे, म्हणजे त्या जमिनीवर कर्ज काढून सुधारणा करायला तर नक्कीच परवानगी असणार आहे. रणजितला वाटले, की महसूल कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करावी.

त्यानुसार रणजित महसूल कार्यालयात चौकशीसाठी गेला व त्याने महसूल अधिकाऱ्याला भेटून सांगितले, की मी एक सैनिक आहे आणि मला सरकारकडून जमीन मिळालेली आहे. मला गावातील काही लोकांनी असे सांगितले आहे, की ही जमीन तुला विकता येणार नाही तसेच गहाणसुद्धा ठेवता येणार नाही.

Agriculture Land
Land Dispute : जमिनीचे वाद मिटवून ६५४ जणांचा ‘सलोखा’

त्यावर महसूल अधिकाऱ्याने रणजितला सांगितले, की तुम्हाला ही जमीन विकता येणार नाही, आणि दुसऱ्याला कसायला देता येणार नाही. तेव्हा रणजितने महसूल अधिकाऱ्याला एक प्रश्न केला, की या जमिनीवर कर्ज काढून जमीन सुधारणा करायला तर नक्कीच परवानगी असणार!

महसूल अधिकाऱ्याने रणजितला सांगितले, की तुम्हाला जमीन सुधारणा करण्याकरिता या जमिनीवर कर्ज नक्की मिळेल आणि तुम्हाला या जमिनीवर कर्ज काढण्याकरिता कोणाच्याही परवानगीची देखील गरज नाही. अधिकाऱ्याचे हे म्हणणे ऐकूण रणजित फार आनंदी झाला. सांगावयाचे तात्पर्य म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार नवीन शर्तीच्या जमिनीवर कर्ज काढायला कोणाच्याही पूर्वपरवानगीची गरज नाही. या संदर्भातील महसूल संहितेमधील कलम ३६ (४)च्या कायदेशीर तरतुदी आवर्जून माहिती करून घेतल्या पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com