Painganga Project : धरणग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली?

Irrigation Project : निम्न पैनगंगा प्रकल्पात आंदोलनाची धग कायम असताना नांदेड आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून अधिसूचनांचा भडिमार केला जात आहे.
Padalse Project
Padalse ProjectAgrowon
Published on
Updated on

Mahur News : निम्न पैनगंगा प्रकल्पात आंदोलनाची धग कायम असताना नांदेड आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून अधिसूचनांचा भडिमार केला जात आहे. बुडीत क्षेत्रातील आंदोलक शेतकऱ्यांच्या न्यायिक मागण्यांकडे दुर्लक्ष करून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रकल्पाचे कार्यरंभ आदेश काढल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.

निम्न पैनगंगा प्रकल्प चिमटा धरणात पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट आणि यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, घाटंजी तालुक्यातील एकूण १८ गावे बुडीत क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. यातील बहुतांश गावे ही पेसा अंतर्गत असून अधिकांश ग्रामपंचायत प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभेचे ठराव पारित केलेले आहेत.

Padalse Project
Upper Painganga Water Project : ‘ऊर्ध्व पैनगंगा’त सात बंधाऱ्यांचा समावेश

स्थानिक दलाल मंडळीच्या मदतीने प्रशासनाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून राजकीय पुढाऱ्यांना शोभेल इतक्या मोठ्या प्रमाणात आश्वासनाची खैरात वाटत बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना हातावर चंद्र दाखविले होते.

Padalse Project
Painganga River : वाण, मोर्णा, विद्रूपा, मन, तोरणा, पैनगंगाचे होणार खोलीकरण

प्रशासनाच्या भूलथापांना बळी जाऊन खंबाळा वासियांनी धरणाला समर्थन दिल्यामुळे प्रशासनस्तरावरून मोठ्या हालचाली होऊन भूसंपादन, पुनर्वसनाची अधिसूचना काढण्यात आल्या तर दोन दिवसांपूर्वी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता यांनी प्रकल्पाचे कार्यारंभ आदेश कंत्राटदार कंपनीला सुपूर्द केले. शेतकऱ्यांच्या समस्या, मागण्या जैसे थे असून त्यावर कुठलाही सकारात्मक तोडगा न काढता प्रशासनाने वर्क ऑर्डर काढण्याची कृती केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

आधीसूचना निघाल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात भेटीसाठी गेले असता सहायक जिल्हाधिकारी भेटण्यास देखील तयार नाही. हेच का सबका साथ सबका विकास, आणि आता कामाची वर्क ऑर्डर निघाली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कंत्राटदाराला आमच्या जमिनीवर पाय ठेवू देणार नाही.
- डॉ. पिंटू चव्हाण, शेतकरी, खंबाळा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com