Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : वडसद परिसरातील शेकडो एकर शेतीपिके जमीनदोस्त

Heavy Rain Crop Loss : शनिवारी व रविवारी पुरामुळे वडसद परिसरातील शंभर एकरपेक्षा जास्त शेती पिके जमिनदोस्त होण्याबरोबरच माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : शनिवारी व रविवारी पुरामुळे वडसद परिसरातील शंभर एकरपेक्षा जास्त शेती पिके जमिनदोस्त होण्याबरोबरच माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली असली तरी भरपाईला वेळ लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

धनसळपासून सुरू होणाऱ्या नाल्याच्या काठावरील वडसद शिवारातील भाऊराव राठोड, सुधाकर जाधव, रवी जाधव, उत्तम राठोड, राजेश जाधव, मोहन जाधव, सतीश चव्हाण, गणेश चव्हाण, किसन राठोड, संदीप आडे, बाळू आडे, साहेबराव राठोड, विजय काळे, गोपाल मुखरे, संजय जाधव, भारत जाधव, विशाल काळे, विठ्ठल काळे, भाऊराव काळे, दिगंबर दशरथे, उल्हास जाधव, जमला राठोड, षडानन चव्हाण यांच्या शेतातील शेंगा धरलेले सोयाबीन, परिपक्व झालेली कपाशी व तूर पिके नष्ट होऊन शेतातील माती खरडून गेली.

डॉ. विजय राठोड, डॉ. सुरेंद्र बिलोलीकर यांच्या शेतातील फळपिके व सोयाबीन असे एकूण शंभर एकरपेक्षा जास्त एकरातील शेती पिकांचे नुकसान झाले. प्रशासनातर्फे आता कुठे पंचनामे विषय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी मदतीबाबत कुठलेच ठोस उपाय न केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात रोष असून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी आहे.

मी मागील शुक्रवारी शेतातील कपाशीला सात बॅग रासायनिक खत टाकले होते. पीक बहरात असताना जमीन खरडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतजमिनीत माती नसल्याने शेती कशी करावी असा प्रश्न आहे. प्रशासनाने आर्थिक मदत दिली तरी तूट भरून निघणार नसून शासनाने शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक मदतीसह शेतीसाठी आवश्यक असलेली माती पुरवावी.
- साहेबराव राठोड, शेतकरी, वडसद, ता. पुसद, जि. यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Farmer Challenges: पांढऱ्या सोन्याची शोकांतिका

Indian Farmer Challenges: आठ हात लाकूड, नऊ हात धिपली

Pune Water Circulation: नऊ धरणांतून उन्हाळी आवर्तन

Job Recruitment Policy: नोकरी देताना भरती नियमांचे पालन आवश्‍यक

Ready Reckoner Rates: रेडीरेकनर दर वाढ स्थगित

SCROLL FOR NEXT