Goat Feed Management Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Feed Management : उन्हाळ्यात कसं असाव शेळ्यांच्या आहाराच नियोजन

चाऱ्याची कुट्टी करून शेळ्यांना हिरवा आणि वाळलेला चारा मिसळून द्यावा. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे जेणेकरून शेळ्या आवडीने चारा खातात.

Team Agrowon

उन्हाळ्यात शेळ्यांना कमी खाद्य, कमी प्रमाणात मिळणारा हिरवा चारा, कमी पाणी आणि अति उष्णतेचा त्रास होतो. याचा परिणाम शेळ्यांच्या शरीरावर झाल्याने प्रजनन क्रिया थांबते किंवा प्रजननामध्ये अडथळे निर्माण होतात. अशा वेळी शेळ्यांच्या आहाराच व्यवस्थापन कसं कराव याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे यांनी दिलेली माहिती पाहुया. 

वाढत्या तापमानात उष्णतेचा ताण बसल्यास गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते. शरीरातील क्षारांचे संतुलन बिघडल्यामुळे शेळ्यांना आम्ल पित्ताचा त्रास होऊन जुलाब होऊ शकतात. अति उष्णतेमुळे शेळ्यांमधील प्रतिकारशक्ती कमी होऊन उत्पादनाबरोबर आरोग्यावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होते. अशा वेळी आहाराचे नियोजन करताना शेळ्यांना दिवसभरात लागणारा चारा एकावेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची कुट्टी करून शेळ्यांना हिरवा आणि वाळलेला चारा मिसळून द्यावा. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे जेणेकरून शेळ्या आवडीने चारा खातात.

शेळ्यांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळ किंवा सायंकाळी द्यावा. जेणेकरून शेळ्यांच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होणार नाही. ताण सहन करण्यासाठी आणि शरीरातील बिघडलेल्या क्षारांचा समतोल रहावा यासाठी शेळ्यांना योग्य प्रमाणात खनिज मिश्रण द्यावे.  

उन्हाळ्यात शेळ्यांच्या शरीरातील पाण्याचे संतुलन ठेवण्यासाठी सोडियम, पोटॅशिअमचे प्रमाण चांगल्या पातळीवर ठेवण गरजेच असत. कारण वाढलेल्या तापमानामुळे शेळ्यांच्या शरिरातून पोटॅशियम जास्त प्रमाणात बाहेर टाकल जात.  शारीरिक तापमान समतोल साधण्यासाठी अॅन्टिऑक्सिडंट्‍स जसे जीवनसत्त्व क आणि ई चा आहारात समावेश करावा.

उन्हाळ्यात शेळ्यांची भूक कमी होते, अशावेळी कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त पोषक घटक देऊन उत्पादन घेता येते. त्यासाठी शेळ्यांना खाद्यातून बायपास फॅट द्यावेत. शेळीच्या पोटात बायपास फॅटवर कुठलीच प्रक्रिया होत नसल्याने कोठी पोटाचे तापमान कमी राखण्यास मदत होते.

शेळ्यांच्या आहारात बटाट्याचा वापर केल्यास, बटाट्यातील स्टार्च व जीवनसत्त्व क च्या उपलब्धतेमुळे ताण कमी करण्यास मदत होऊन दुधाची उत्पादकता वाढते.

चरण्याची वेळ

चराऊ शेळीपालनामध्ये चरण्याच्या वेळा बदलाव्यात. सकाळी लवकर किंवा सायंकाळी शेळ्या चरण्यासाठी सोडाव्यात, जेणेकरून बराचसा काळ शेळ्या गोठ्यात राहतील आणि शेळ्यांना उन्हाचा ताण येणार नाही. उन्हाळ्यात खाद्यामध्ये कमी तंतुमय घटक असलेले रेशन दिल्यास त्याचा पचनक्रियेवर चांगला परिणाम होऊन उत्पादकता टिकून राहते.

चारा प्रक्रिया

उन्हाळ्यातील दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध असलेल्या सर्वच प्रकारच्या सुक्या व निकृष्ट चाऱ्यावर जसे की, गव्हाचे काड किंवा कोंडा, सोयाबीनचे कुटार, तूर हरभऱ्याचा भुसा, किंवा वाळलेल्या वैरणीवर प्रक्रिया करावी. प्रक्रिया करताना १०० किलो चाऱ्यासाठी युरिया २ किलो, गूळ किंवा मळी १ किलो, क्षार मिश्रण १ किलो, खडे मीठ १ किलो आणि पाणी २० लिटर या प्रमाणे प्रक्रिया करून चाऱ्याची पौष्टिकता वाढविता येते. अशी प्रक्रिया करुन पशुखाद्याचा खर्च आटोक्यात येऊन उत्पादकता टिकवून ठेवता येते.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

Orange Crop Insurance: संत्रा उत्पादकांना १७ कोटींचा विमा परतावा

Livestock Competition: लिंबोटीचा लालकंधारी वळू ठरला चॅम्पियन

Agriculture Crisis: अनियमित विजेमुळे रब्बी पिके धोक्यात

Vijay Wadettiwar: 'चंद्रपूर में टायगर अभी जिंदा हैं'; काँग्रेसच्या ८ नगराध्यक्षांच्या विजयानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT