Team Agrowon
प्रत्येक दुधाळ जनावरांना किमान दोन ते तीन महिने भाकड अवस्थेमध्ये ठेवणे गरजेचे असते.
या काळात गाईचा गर्भ सहा ते सात महिन्यांचा असेल तर परिस्थिती अजूनच चांगली होते, कारण २८० दिवसांचा गर्भावस्थेच्या काळ पूर्ण होऊन जनावर लगेच दूध उत्पादनास सुरुवात करते.अशा वेळेस भाकड व्यवस्थापनाचा काळ महत्त्वाचा ठरतो.
बरेच दिवस दूध दिल्यामुळे जनावरांच्या शरीरातील अनेक पोषक घटक हे दूध मार्गाने बाहेर पडलेले असतात. त्यामुळे जनावरांचे शरीर अशक्त होत असते.
सहाव्या ते सातव्या महिन्याच्या गर्भावस्थेमध्ये गाईच्या गर्भाची वाढ जोमाने होत असते.
गर्भातील वासराला कमी पोषकतत्व मिळाले तर अशा वासरांची वाढ खुंटू शकते व तसेच वासरे कमजोर होतात.
सर्वप्रथम भाकड पण गर्भधारणा केलेल्या गाईस इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे. अशा जनावरांना विशेष पशू आहार द्यावा.
ज्या गाईंचं दूध उत्पादन अंतिम टप्प्यात सुद्धा पाच लिटर किंवा पाच लिटर पेक्षा जास्त असेल, अशा गाईंचं दूध उत्पादन पशुखाद्य टप्प्याटप्प्याने कमी करावं. अशा गाईंचं दूध दोहन टप्प्याटप्प्याने जसे की एक दिवस किंवा दोन ते तीन दिवसांच्या अंतरान करावं.