Atal Bhujal Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Bhujal Award : ‘भूजल’ ग्रामस्पर्धेतील ग्रामपंचायतींचा सन्मान

Ground Water Rich Village : अटल भूजल योजनेच्या भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायतींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

Team Agrowon

Pune News : अटल भूजल योजनेच्या भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायतींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. यावेळी काऱ्हाटी ग्रामपंचायतीला पहिले ५० लाखांचे, सोनोरीला दुसरे ३० लाखांचे तर चांबळीला तिसरे २० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होणारी घसरण थांबविण्याकरिता केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसह्यित अटल भूजल योजना २६ नोव्हेंबर २०२० पासून राबविण्यात येत आहे.

त्याअंतर्गत ‘भूजल समृद्ध ग्रामस्पर्धा २०२२-२३’ चे निकाल नुकतेच जाहीर झाले होते. त्यात जिल्हास्तरावर बारामती तालुक्यातील काऱ्हाटी या गावाने प्रथम, पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि चांबळी या गावाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.

लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा या योजनेचा गाभा आहे. त्याकरिता ग्रामस्तरावर जल अंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरून काढणे हे उद्दिष्ट आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील २२ ग्रामपंचायती, बारामतीतील आठ ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांची एकूण ५५० गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे मूल्यांकन उपविभागस्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर करण्यात आले. त्यानुसार या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

अटल भूजल योजनेत अनेक गावे चांगली कामे करीत आहेत. त्यामुळे त्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात देखील अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत सक्रिय सहभाग घेऊन गावाचा विकास करावा.
- दिवाकर धोटे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवग्याचा भाव १० हजारांवर; सोयाबीन दरात चढ-उतार, कापूस स्थिर, मोहरीला उठाव, तर वांग्याची आवक कमीच

Cooperative Sector: सहकार धोरण समितीवर डॉ. चेतन नरके

Weather Update: राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमानात चढ उतार सुरु

Poly Mulching Farming: पॉलिमल्चिंगची मागणी घटली

Chana Farming: नियोजनबद्ध हरभरा लागवडीत सातत्य

SCROLL FOR NEXT