Bhujal Award : भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत निपाणा ग्रामपंचायत ठरली अव्वल

Ground Water Rich Village : केंद्र शासनाच्या अटल भूजल २०२२-२०२३ ग्राम समृद्ध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेमध्ये मोताळा तालुक्यातील निपाणा या गावाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावित ५० लाखांचे बक्षीस प्राप्त केले आहे.
Bhujal Award
Bhujal AwardAgrowon
Published on
Updated on

Buldana News : केंद्र शासनाच्या अटल भूजल २०२२-२०२३ ग्राम समृद्ध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेमध्ये मोताळा तालुक्यातील निपाणा या गावाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावित ५० लाखांचे बक्षीस प्राप्त केले आहे. या ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नामांकन मिळाले आहे.

द्वितीय क्रमांकावर शेलगाव बाजार असून या गावाला ३० लाखांचा पुरस्कार तर वरुड या गावाला २० लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. यामुळे मोताळा तालुक्यात तब्बल १ कोटींची बक्षीसे या योजनेअंतर्गत मिळणार आहेत.

Bhujal Award
Bhujal Recharging : भूजल वाढविण्यासाठीच्या उपाययोजना

भूजलच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरीता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागी भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसहायित अटल भूजल योजना २०२० मधे सुरू करण्यात आली.

महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ४३ तालुक्यांमधील १ हजार १३३ ग्राम पंचायतींमध्ये ही योजना सुरू आहे. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा आहे. या योजनेत जास्तीतजास्त ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा, यासाठी गावागावामधे सुदृढ स्पर्धा निर्माण करणे, हे अटल भूजल योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते.

Bhujal Award
Atal Bhujal Yojana : अटल भूजल’ स्पर्धेत सोलापुर जिल्ह्याचा वरचष्मा

ते साध्य होण्यासाठी २०२२-२०२३ व २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी ''भूजल समृद्ध ग्राम'' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २०२२-२०२३ या वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. या ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबविले. जिल्हास्तरावरील समितीने सहभागी गावांची पाहणी करून मूल्यांकन केले.

केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेअंतर्गत झालेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये निपाणा गावाला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला. याबाबतचे परिपत्रक शासनाने नुकतेच काढले केले आहे. ज्यामध्ये आपल्या गावाला ५० लाख रुपये पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शक्य झाले.- शारदा संतोष तांदुळकर, सरपंच, ग्रामपंचायत, निपाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com