Atal Bhujal Yojana : अटल भूजल’ स्पर्धेत सोलापुर जिल्ह्याचा वरचष्मा

Bhujal Samruddha Competition : अटल भूजल योजनेअंतर्गत 'भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा' निकाल जाहीर झाला आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये माढा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी तीनही पुरस्कार पटकाविले आहेत.
Atal Bhujal Yojana
Atal Bhujal YojanaAgrowon
Published on
Updated on

Solapur News : अटल भूजल योजनेअंतर्गत 'भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा' निकाल जाहीर झाला आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये माढा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी तीनही पुरस्कार पटकाविले आहेत. भेंड ग्रामपंचायतीस प्रथम, लोंढेवाडीस द्वितीय तर सोलंकरवाडीस तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे ५० लाख, ३० लाख व २० लाखांची बक्षिसे मिळविली आहेत.

अटल भूजल योजनेमध्ये उत्कृष्ट लोकसहभाग नोंदवणाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षांसाठी या ग्रामपंचायतींना पुरस्काराने गौरविण्यात येईल.

Atal Bhujal Yojana
Atal Bhujal Yojana : ‘अटल भूजल’द्वारे जिरणार १६ कोटी लिटर पाणी
सर्व गावकऱ्यांनी साथ दिल्यामुळे आम्ही प्रथम क्रमांक पटकावू शकलो. भूजल पातळीत वाढ करण्यासाठी पीक पद्धती, सिंचन पद्धती बदलाच्या दृष्टीने प्रयत्न केले व त्यात यश मिळाले.
डॉ. संतोष दळवी, माजी सरपंच, भेंड
पिण्याचे पाणी व सिंचन योजनांबाबतीत दुर्लक्षित आमच्या छोट्या खेड्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या बक्षिसामुळे आम्हाला हत्तीचे बळ मिळाले.
अनंता गलांडे, माजी सरपंच, सोलंकरवाडी
Atal Bhujal Yojana
Atal Bhujal Yojana : अटल भूजल यंत्रणेची जिल्हास्तरीय कार्यशाळा
भूजल पातळीसह देशी वृक्षांचे गाव म्हणून आमची ओळख निर्माण होत आहे. यातूनच ग्रामीण पर्यटन केंद्र म्हणून आमचे गाव नावारूपास येईल.
संतोष लोंढे, सरपंच, लोंढेवाडी
लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे, यासाठी या तिन्ही ग्रामपंचायतींनी लोकसहभागाचे एक समर्पित उल्लेखनीय कामगिरीचे उदाहरण ठेवले आहे. हे यश अटल भूजल योजनेत सहभागी प्रत्येक गावात उत्साहाची ज्योत प्रज्वलित करणारी ठिणगी असेल.
डॉ. मुश्ताक शेख, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com