Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Insurance : हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारीला पीकविमा योजना लागू

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप २०२५ हंगामात हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या ६ पिकांचा समावेश आहे.

Team Agrowon

Hingoli News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप २०२५ हंगामात हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या ६ पिकांचा समावेश आहे.बुधवार (ता.९) सकाळ पर्यंत शेतकऱ्यांनी १५ हजार १८६ विमा अर्ज दाखल करत ९ हजार १२५ हेक्टरवरील पिकांसाठी ५१ कोटी ७१ लाख रुपये विमा संरक्षण घेतले आहे. ९५ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे.

विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी ३१ जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज दाखल करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय पीक विमा समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी केले आहे.शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in या केंद्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज भरावेत.

अर्ज प्रक्रियेसाठी केंद्र शासनाने ४० रुपये मानधन निश्चित केले असून त्याव्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त रक्कम सीएससी चालक मागत असल्यास १४४४७ या निःशुल्क क्रमांकावर तक्रार नोंदवावी.दुसऱ्याच्या जमिनीवर, शासकीय जमीन, गायरान, मंदिर, देवस्थानाच्या जमिनीवर बोगस पीक दाखवून विमा घेतल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.फसवणूक करणाऱ्या अर्जदारांना पुढील ५ वर्षे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही.

पिकविम्यासाठी अॅग्रीस्टॅक अंतर्गंत फार्मर आयडी,ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असून, ई-पीक पाहणी व प्रत्यक्ष पीक यात तफावत आढळल्यास विमा रद्द होऊ शकतो. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा,आधार कार्ड,बँक पासबुक व स्वयंघोषणा घेऊन अर्ज करावा. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा नको असल्यास अर्ज करण्याच्या ७ दिवस आधी बँकेस लेखी कळवावे लागेल.

जिल्ह्यात यंदा भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत पीकविमा योजना राबविली जात आहे. अधिक माहितीसाठी ई-मेल pikvima@alcofindia.com.पीकविमा तक्रार निवारण अधिकारी ः हिंगोली शिवसंदीप रणखांब (८७६६४०३१७९), कळमनुरीः कठाळू जाधव (७५८८१५३१५०), वसमतः सुनील भिसे(७५८८०१८६६७), औढानागनाथ ः शिवप्रसाद संगेकर(८४०८८४०४८७), सेनगावः संदीप वळकुंडे (८९९९२३५४०१).

पीकनिहाय हेक्टरी विमा संरक्षण, शेतकरी विमा हप्ता (रुपयात)

पीक विमा संरक्षित रक्कम शेतकरी विमा हप्ता

सोयाबीन ५८००० ११६०

कपाशी ६०००० ६००

तूर ४३००० ४३०

मूग २६००० ६५

उडीद २५००० ६२.५०

ज्वारी ३३००० ८२.५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT