Kolhapur News: कोल्हापूर येथील एमराल्ड इरा ॲग्रो प्रा. लि. कंपनीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले..या उपक्रमासोबतच आदित्य बिर्ला कॅपिटल हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने एमराल्ड इरा ॲग्रोच्या सर्व कर्मचाऱ्यांची बोन डेन्सिटी (हाडांची घनता) तपासणीही करण्यात आली. आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने ही तपासणी उपयुक्त ठरली. एमराल्ड इरा ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. .Blood Donation : रक्तदानाचे महत्व काय?.यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षता पवार, तांत्रिक अधिक्षक सुनिता जाधव, जनसंपर्क अधिकारी लखन पाटील, तंत्रज्ञ सुनील पाटील, अस्मिता जाधव, यांनी रक्तदानाबाबत आवश्यक माहिती, आरोग्य तपासणी व मार्गदर्शनही वैद्यकीय पथकाच्या वतीने करण्यात आले..Blood Donation : कृषी पदवीधरांनी जमवले ५०३ बाटल्या रक्त.रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच एमराल्ड इरा ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक पंकज महाडीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. .या कार्यक्रमाचे संयोजन एमराल्ड इराच्या कार्यपालन अधिकारी नेहा पच्छिंद्रे, व्यवस्थापक सुरजकुमार परळे, कार्यालयीन अधिक्षक मधुरा पाटील, वैभव माने आणि सहकाऱ्यांनी संयोजन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.