Chana Varieties Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Varieties : अधिक उत्पादन देणाऱ्या हरभरा जाती

Chana Cultivation : आंतरपीक आणि फेरपालटीसाठी हरभरा पिकाची निवड करावी. या पिकाच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. हरभरा पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते, पोत टिकून राहतो.

Team Agrowon

डॉ. नंदकुमार कुटे, डॉ.अरविंद तोत्रे, डॉ. सुदर्शन लटके

Chana Crop : हरभरा हे डाळवर्गीय पीक असल्यामुळे या पिकांच्या मुळावरील गाठीतील रायझोबियम जिवाणूमार्फत हवेतील नत्राचे साधारणपणे १३५ किलो प्रति हेक्टरी स्थिरीकरण केले जाते. त्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते. तसेच जमिनीची सुपीकता वाढते.


१) विजय ः
- कालावधी : जिरायती ८५-९० दिवस, बागायती १०५-११० दिवस
- अधिक उत्पादन क्षमता, मर रोगास प्रतिकारक्षम, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता, जिरायती, बागायती भागास आणि उशिरा पेरणीस योग्य.
-महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासाठी प्रसारित.
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
जिरायती : प्रायोगिक उत्पादन : १४-१५, सरासरी उत्पादन : १४
बागायती : प्रायोगिक उत्पादन: ३५-४०, सरासरी उत्पादन : २३
उशिरा पेरणी : प्रायोगिक उत्पादन: १६-१८, सरासरी उत्पादन : १६

विशाल ः
- कालावधी : बागायती ११०-११५ दिवस
- आकर्षक पिवळसर टपोरे दाणे, १०० दाण्याचे वजन २८ ग्रॅम, मर रोगास प्रतिकारक्षम, प्रथिनांचे प्रमाण अधिक.
- घाटे आकाराने मोठे असून गर्द हिरवे, पश्‍चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित.
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
- जिरायती : प्रायोगिक उत्पादन : १४-१५, सरासरी उत्पादन : १३
- बागायती : प्रायोगिक उत्पादन : ३०-३५, सरासरी उत्पादन : २०

दिग्विजय
- कालावधी : बागायती ११०-११५ दिवस
- पिवळसर तांबूस टपोरे दाणे, १०० दाण्यांचे वजन २४ ग्रॅम, मर रोगास प्रतिकारक्षम, जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीत योग्य.
- घाटे आकाराने मोठे असून गर्द हिरवे, महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित.
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
जिरायती : प्रायोगिक उत्पादन : १४-१५, सरासरी उत्पादन : १४
बागायती : प्रायोगिक उत्पादन: ३५-४०, सरासरी उत्पादन : २३
उशिरा पेरणी : प्रायोगिक उत्पादन: २०-२२, सरासरी उत्पादन : २१

फुले विक्रम
- कालावधी : १०५-११० दिवस
- घाटे जमिनीपासून एक फुटाच्यावर लागतात. वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त.
- पीक लोळत नाही, मर रोगास प्रतिकारक्षम, अधिक उत्पादन क्षमता.
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, दक्षिण राजस्थानसाठी प्रसारित.
उत्पादन (क्विंटल/ हे.):
जिरायती ः प्रायोगिक : १६-१८, सरासरी उत्पादन : १६
बागायती ः प्रायोगिक : ४०-४२, सरासरी उत्पादन : २२
उशिरा पेर ः प्रायोगिक : २२-२४, सरासरी उत्पादन : २१

फुले विक्रांत
- पक्वता कालावधी : १०५ ते ११० दिवस
- पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे दाणे, १०० दाण्यांचे वजन १९.९ ग्रॅम
- बागायती पेरणीसाठी योग्य, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, दक्षिण राजस्थान राज्यासाठी प्रसारित.
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
- उत्पादन क्षमता ः ४१.६६. सरासरी उत्पादन ः २०


फुले विश्‍वराज ः
- पक्वता कालावधी : ९५-१०५ दिवस
- पिवळसर तांबूस रंगाचा, मध्यमदाणे असून, १०० दाण्यांचे वजन २२ ग्रॅम.
- जिरायती पेरणीसाठी योग्य, मर रोग प्रतिकारक्षम, पश्‍चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित.
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
जिरायती ः प्रायोगिक उत्पादन २८-२९, सरासरी उत्पादन : १५-१६

जाकी-९२१८ ः
- विदर्भ विभागासाठी प्रसारित, मर रोग प्रतिकारक्षम १०० दाण्याचे वजन २२-२६ ग्रॅम.
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
-जिरायती उत्पादन : १५-१६
- बागायती उत्पादन : २६-२८

पीडीकेव्ही कांचन
- पक्वता कालावधी : १०५-११०,
- मर रोग प्रतिकारक्षम, टपोरे दाणे, विदर्भ विभागासाठी प्रसारित
उत्पादन (क्विंटल/ हे.) ः
- बागायती ः प्रायोगिक उत्पादन : ३५-४२, सरासरी उत्पादन : १८-२०

पीडीकेव्ही कनक ः
- पक्वता कालावधी : १०८-११०
- यांत्रिक पद्धतीने काढणीकरता योग्य, संरक्षित ओलिताखाली लागवडीसाठी शिफारस.
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातसाठी प्रसारित.
उत्पादन (क्विंटल/ हे.) ः
- सरासरी उत्पादन : १८-२०

बीडीएनजी-७९७ (आकाश) ः
- मराठवाडा विभागासाठी प्रसारित
- मर रोग प्रतिकारक्षम, मध्यम आकाराचे दाणे, १०० दाण्याचे वजन १८-२० ग्रॅम, अवर्षण प्रतिकारक्षम.
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
- जिरायती उत्पादन : १४-१५
- बागायती उत्पादन : २०-२२

जवाहर ग्राम-२४ (जेजी-२०१६-२४)
- पक्वता कालावधी : ११०-११५
- मर रोग प्रतिकारक्षम, यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त. १०० दाण्याचे वजन २९.३ ग्रॅम.
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासाठी प्रसारित.

आरव्हीजी- २०२ (राजविजय २०२) ः
-पक्वता कालावधी : १०५-११०
- उशिरा पेरणी करता योग्य, मर रोग प्रतिकारक्षम.
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासाठी प्रसारित.

आरव्हीजी- २०४ (राजविजय २०४) ः
- पक्वता कालावधी : १०८-१११
- यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त, मध्यम मर रोग प्रतिकारक्षम, १०० दाण्याचे वजन २३.४ ग्रॅम.
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासाठी प्रसारित.

पुसा मानव (पुसा ग्राम-२०२११) ः
- पक्वता कालावधी : १०८-११०
- निमपसरट जात, १०० दाण्याचे वजन १९.५ ग्रॅम.
- मर रोग अधिक प्रतिकारक्षम, कोरडी मूळकुज, मानकुज आणि खुजा रोग प्रतिकारक्षम.

काबुली जाती
विराट ः

-पक्वता कालावधी : ११०-११५
-अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारकक्षम, महाराष्ट्र राज्य साठी प्रसारित, १०० दाण्यांचे वजन ३५ ग्रॅम.
उत्पादन (क्विंटल/ हे.):
- जिरायती ः प्रायोगिक उत्पादन : १०-१२, सरासरी उत्पादन : ११
- बागायती प्रायोगिक उत्पादन : ३०-३२, सरासरी उत्पादन : १८

कृपा ः
- पक्वता कालावधी : १०५-११०
- जास्त टपोरे दाणे, १०० दाण्यांचे वजन ५९.४ ग्रॅम, मर रोग प्रतिकारकक्षम, सफेद पांढरे दाणे.
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यासाठी प्रसारित.
उत्पादन (क्विंटल/ हे.):
- सरासरी उत्पादन-१६-१८, प्रायोगिक उत्पादन : ३०-३२

काक-२, पीकेव्ही-२ ः
- पक्वता कालावधी : १००-१०५
-अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारकक्षम, १०० दाण्यांचे वजन ३७-४० ग्रॅम
उत्पादन (क्विंटल/ हे.) : २६-२८

पीकेव्ही-४ (प्रसारित वर्ष २००८)
- पक्वता कालावधी : १००-११०
- अधिक टपोरे दाणे, मर रोगास मध्यम प्रतिकारकक्षम.१०० दाण्यांचे वजन ५०-५३ ग्रॅम.
- विदर्भासाठी प्रसारित.
उत्पादन (क्विंटल/ हे.): १६-१८
------------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. नंदकुमार कुटे, ७५८८५१३३९८
(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Water Grid Project : मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुनरुज्जीवित करू

Soybean Procurement : पोर्टल बंद केल्याने रखडली सोयाबीन नोंदणी

Sugarcane Season 2024 : ‘बळीराजा’चे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Crop Insurance : विमा कंपनी प्रतिनिधीने पैशांची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी

Rabi Season 2024 : नांदेड जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी

SCROLL FOR NEXT