Solapur APMC Election Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC Election : सोलापूर बाजार समितीसाठी चुरशीने मतदान; आज निकाल

APMC Market Update : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी (ता.२७) काही किरकोळ प्रकार वगळता अत्यंत चुरशीने मतदान झाले.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी (ता.२७) काही किरकोळ प्रकार वगळता अत्यंत चुरशीने मतदान झाले. उन्हाची प्रचंड तीव्रता असतानाही, सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. दुपारपर्यंत ६० टक्के मतदान आटोपले होते. या निवडणुकीत सोसायटी मतदार संघापेक्षा ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, आज मतमोजणी होणार आहे.

बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी ७० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ५४३१ एकूण मतदार आहेत. सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला, नान्नज, तिऱ्हे, मंद्रूप, आहेरवाडी, निंबर्गी, वळसंग आणि बोरामणी या आठ मतदान केंद्रांवर मतदान झाले. या सर्व मतदान केंद्रावर पोलिस आणि प्रशासनाचे प्रतिनिधी प्रत्यक्ष प्रक्रिया पार पाडत होतेच, पण या केंद्रांवर वॅाच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते,

सकाळी आठ ते दहा या दोन तासांत २० टक्के मतदान झाले, दुपारपर्यंत जवळपास ६० टक्के मतदान झाले होते. सोलापुरातील सिद्धेश्वर प्रशाला, नान्नज, निंबर्गी या केंद्रावर मतदारांची सर्वाधिक गर्दी राहिली.

निंबर्गी येथे काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आणि भाजपचे अप्पू पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली, हा प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदार संघातून ४, व्यापारी मतदारसंघातून २ आणि हमाल-तोलार मतदारसंघातून एक असे १८ संचालक निवडून देण्यात येणार आहेत.

भाजप विरुद्ध भाजप लढत

बाजार समितीच्या या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासह युती करत पॅनेल उभा केला आहे.

पण या पॅनल विरोधात भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनीही स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. त्यात त्यांना भाजपचे दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांनी साथ दिली आहे, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, बाळासाहेब शेळके, महादेव चाकोते यांनी पाठिंबा दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT