Solapur APMC Election : यश कुणाच्या पदरात? पाटील, वानकर, चिवडशेट्टी की देशमुख?

APMC Election Update : भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख या मतदारसंघातून लढत असल्याने या लढतीची उत्सुकता वाढली आहे.
Solapur APMC
Solapur APMCAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातील लढत प्रचंड उत्सुकतेची ठरत आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख या मतदारसंघातून लढत असल्याने या लढतीची उत्सुकता वाढली आहे.

या मतदारसंघातील संचालकांच्या दोन जागांसाठी ११ जण मैदानात आहेत. खरी लढत मात्र गणेश वानकर व संगमेश पाटील यांच्या विरुद्ध मनीष देशमुख व रामप्पा चिवडशेट्टी यांच्यात होत आहे. या चार दिग्गजांपैकी दोघांचा पराभव नक्की आहे. यश कोणाच्या पदरात पडणार? पाटील, वानकर, चिवडशेट्टी की देशमुखांच्या? याचे कोडे सोमवारी (ता. २८) मतमोजणी दिवशी दुपारपर्यंत सुटणार आहे.

जिल्ह्यात भाजपकडे असलेल्या पाच आमदारांपैकी चार आमदारांच्या मतदारसंघात सोलापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र येते. या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख पॅनेल विरुद्ध आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे अशी विभागणी झाली आहे. आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे माजी आमदार दिलीप माने व सुरेश हसापुरे हे सोसायटी मतदारसंघातील हुकमी एक्के आहेत.

Solapur APMC
Solapur APMC : सोलापूर जिल्ह्यात होणार दक्षिण सोलापूरला स्वतंत्र बाजार समिती

समितीच्या १८ पैकी ११ जागा सोसायटी मतदार संघातील आहे. सोसायटीच्या १८९५ मतांपैकी माने-हसापुरेंकडे १५०० मतांची बेरीज आहे. कितीही कपात केली तरीही हा आकडा १३०० च्या खाली येत नसल्याने सोसायटीपेक्षा ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण मतदारसंघाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पॅनेलला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांची साथ लाभली आहे.

Solapur APMC
Solapur APMC Election : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान

जिल्हाध्यक्ष साठे यांचे उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीत वर्चस्व असल्याने त्याचा थेट लाभ मनीष देशमुख यांना होण्याची शक्यता आहे. आमदार देशमुख यांच्याबद्दल असलेल्या नाराजीमध्ये मनीष देशमुख यांच्या हस्तक्षेपाचे प्रमुख कारण सांगितले जाते. आमदार देशमुख यांनी आपल्या पुत्राचा राजकीय श्रीगणेशा या निवडणुकीतून करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल लोकमंगल परिवारासाठीही महत्त्वाचा असणार आहे.

मनीष देशमुख, डॉ. पृथ्वीराज मानेंची एंट्री

उत्तर व दक्षिणच्या राजकारणात आमदार सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने महत्वाच्यास्थानी आहेत. या निवडणुकीत आमदार देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख हे निवडणुकीत तर माजी आमदार माने यांचे पुत्र डॉ. पृथ्वीराज माने हे निवडणुकीच्या रणनीतीत केंद्रस्थानी आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील सोसायटी आणि ग्रामपंचायतच्या मतदारांचे सगळ्या पध्दतीचे ‘मॅनेजमेंट’ डॉ. माने यांच्याकडे आहे. देशमुख-माने या युवा नेत्यांच्या करियरसाठी देखील हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com