Poultry Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : नायगावातील हायटेक पोल्ट्री ठरतेय आदर्श

Diwali Ank 2024 : पोल्ट्री व्यवसायातील कोणताही पूर्वानुभव नसताना कुटुंबीयांच्या साथीने हायटेक पोल्ट्री व्यवसाय उभारण्याचे धाडस केले. व्यवसायात येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून आवश्यकतेनुसार व्यवस्थापनात योग्य बदल करत गेलो.

Team Agrowon

विवेक चौधरी

Poultry Business Management : मी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर २००७ मध्ये पुण्यातील एका कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून रुजू झालो. त्यानंतर पुढे मॅनेजर पदापर्यंत मजल मारली. माझे मूळ गाव नायगाव (ता. हवेली, जि. पुणे). माझे वडील सुभाषराव चौधरी यांच्याकडे दोन पोकलेन मशिन होत्या. मागील दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ‘अर्थ मूव्हिंग’ व्यवसायाला सुवर्णकाळ होता.

मात्र २०१६ पासून या व्यवसायाला उतारता काळ लागली. वडिलांचे मोठ्या प्रमाणात पैसे यामध्ये गुंतून राहिले होते. हळूहळू काम पण खूप कमी झाले. दरम्यानच्या काळात माझी गुजरातला बदली झाली. घरापासून एवढ्या लांब तिकडे जायचे की नाही याचा विचार मी करत होतो. बरीच वर्षे घरापासून दूर राहिल्याने मीही वैतागलो होतो.

मी वडिलांना सांगितले, की आता मला नोकरी करणे जमणार नाही. मी राजीनामा देऊन दुसरे काहीतरी उद्योगधंद्याचे पाहतो. एका बाजूने वडिलांचे व्यवसायात पैसे गुंतलेले आणि काम कमी झालेले, तर दुसरीकडे माझा नोकरी सोडून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार. अशी द्विधा मनःस्थिती होऊन देखील माझ्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी माझ्या निर्णयात मला खंबीर साथ दिली.

नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे करण्यासाठी वडिलांनी एक पोकलेन मशिन विकले. व्यवसाय करण्याचे ठरविले खरे, पण नक्की कोणता व्यवसाय करावा हा प्रश्‍न पुढ्यात होता. दरम्यानच्या काळात वडील आणि भावासोबत चर्चा केल्यानंतर पोल्ट्री व्यवसायाचा विचार मनात आला. मात्र २००४ मध्ये बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्री व्यवसायात मोठे नुकसान झाल्याचे अनेकांचे अनुभव होते. त्यामुळे या व्यवसायात तुम्ही पडू नका असा सल्ला अनेकांनी दिला. परंतु हार न मानता या व्यवसायाची अधिक माहिती घेण्याचे ठरवले.

ईसी पोल्ट्री फार्म करण्याचे निश्‍चित

आम्ही पोल्ट्री व्यवसायाची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी ओपन पोल्ट्री शेड ही एकच संकल्पना माहिती होती. दरम्यानच्या काळात वातावरण नियंत्रित पोल्ट्री (ईसी पोल्ट्री) विषयी नव्याने माहिती मिळाली. ईसी पोल्ट्रीची संकल्पना आमच्यासाठी नवीन होती. आमच्या भागात त्या वेळी या पद्धतीची पोल्ट्री कोणाचीही नव्हती.

त्यामुळे मी आणि माझा भाऊ नितीन दोघांनी बाहेरगावी फिरून ईसी पोल्ट्री फार्मवर प्रत्यक्ष भेट देत माहिती घेतली. त्यातून ईसी पोल्ट्रीमधील नवीन माहिती मिळाली. त्यानंतर आपण ईसी पोल्ट्री फार्मची उभारणी करायचे, असे निश्चितच केले. मात्र त्यासाठी बऱ्यापैकी खर्च येणार होता. कारण ईसी फार्ममधील वातावरण स्थिर राहण्यासाठी पारंपरिक पोल्ट्री फार्मच्या तुलनेत अधिक गुंतवणूक करावी लागते.

त्यामुळे बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. त्या प्रक्रियेस साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी गेला. अखेर बँकेकडून ५० लाख रुपयांचे कर्ज ईसी पोल्ट्रीसाठी मंजुरी झाले. त्यात स्वतःच्या पदरचे १५ लाख रुपये टाकून सुमारे ६५ लाख रुपये खर्च करत व्यवसायाची पायाभरणी केली. सुमारे २० हजार पक्षिक्षमतेचे पूर्व- पश्‍चिम दिशेने साधारणपणे ४०० फूट लांब व ४० फूट रुंदीचे शेड उभारणी करण्याचे निश्‍चित झाले.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत आजचे कांदा दर?

Narendra Modi : काँग्रेसने गरिबांना लुटले ः मोदी

Sharad Pawar : तासगाव साखर कारखान्याची दयनीय अवस्था करणाऱ्यांना जागा दाखवा; शरद पवार

Irrigation Project : सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण होणार?

Sindkhedraja Assembly Constituency : सिंदखेडराजात काका-पुतणी रिंगणात

SCROLL FOR NEXT