Hemant Soren Agrowon
ॲग्रो विशेष

Hemant Soren oath : आजपासून झारखंडमध्ये सोरेन सरकार; हेमंत सोरेन यांनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

Jharkhand New Chief Minister Swearing Ceremony : झारखंडमध्ये आजपासून सोरेन सरकार सत्तेवर आले असून हेमंत सोरेन यांनी रांचीच्या मोरहाबादी मैदानावर चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या नेतृत्वात झारखंड मुक्ती मोर्चाला (जेएमएम) मोठा विजय मिळाला. निकालानंतर पाचव्या दिवशी झारखंडमध्ये नवे सरकार आले आहे. राज्यपाल संतोष गंगवार यांनी सोरेन यांची झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. सोरेन यांनी चौथ्यांदा तर झारखंडचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

सोरेन यांच्या शपथविधीला त्यांचे वडील आणि तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री शिबू सोरेनही उपस्थित होते. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव देखील उपस्थित होते.

८१ जागा असणाऱ्या झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे भाजप तर दुसरीकडे इंडिया आघाडी मैदानात उतरली होती. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात काँग्रेस, आरजेडी आणि डाव्यांनी ५६ जागा जिंकल्या. तर भाजपला फक्त २४ जागाच जिंकता आल्या. जेएमएमच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीकडे बहुमतापेक्षा १५ जागा अधिकच्या आहेत. तर सत्तास्थापनेसाठी ४१ आमदार लागतात.

यंदा झारखंडमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत एकट्या झामुमोला ३४ जागा मिळाल्या असून काँग्रेसला १६ जागांवर विजय मिळाला आहे. तर राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) ४ आणि डाव्यांनी २ जागा जिंकल्या आहेत.

झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात काँग्रेस, आरजेडी आणि डाव्यांनी ५६ जागा जिंकल्यानंतर निकालाच्या दुसऱ्या दिवशी सोरेन यांनी राज्यपाल गंगवार यांची भेट घेतली होती. तसेच सत्तास्थापनेचा दावा केला होता. सोरेन यांचा एकट्याचा शपथविधी सोरेन यांच्यासह आज इतर काही मंत्र्याचा शपथविधी होईल अशी चर्चा सुरू होती.

पण सोरेन यांनी एकट्याने पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सध्या काँग्रेसने चार आमदारांच्या मागे एक मंत्रिपद अशी मागणी केली आहे. यामुळे मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. पण मागील सोरेन सरकारमध्ये काँग्रेसचे चार मंत्री होते. आताही त्यांचे १६ आमदार निवडून आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT