Hemant Soren : झारखंड निवडणुकीपूर्वी हेमंत सोरेन यांच्या खासगी सचिवाच्या घरावर छापा; आयकर विभागाची कारवाई

Jharkhand Assembly Elections 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभागाने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे खासगी सचिव (पीए) सुनील श्रीवास्तव आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या घरावर छापा टाकला.
Hemant Soren
Hemant SorenAgrowon
Published on
Updated on

Pune News : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या करावाईत आयकर विभागाने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे खासगी सचिव (पीए) सुनील श्रीवास्तव आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. आयकर विभागाने १६ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. तर ही छापेमारी करात काही अनियमिततेबाबत करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढला आहे. झारखंडमधील मतदान १३ नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्रातील मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. यादरम्यान झारखंडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाने छापेमारी केल्याने मुख्यमंत्री सोरेन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Hemant Soren
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा ४० लाख; जेवन, चहासह इतर खर्चाचा हिशोब उमेदवाराला द्यावा लागणार

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने रांचीमधील ७ आणि जमशेदपूरमध्ये ९ ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये जमशेदपूरच्या अंजनिया रुग्णालयासह इतर ठिकाणांचा समावेश असून सोरेन यांचे खासगी सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर देखील छापेमारी झाली आहे.

या छापेमारीत श्रीवास्तव यांच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. सध्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर अशी छापेमारी झाल्याने पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Hemant Soren
Paddy MSP : झारखंड सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय; एमएसपी व्यतिरिक्त, धानावर प्रति क्विंटल १०० रुपये बोनस

आयकर विभागाने कर अनियमिततेसंदर्भात हा छापा टाकला असून श्रीवास्तव यांनी करात काही अनियमितता केल्याची माहिती आयटीला मिळाली होती. त्यानंतर विभागाने ही कारवाई केली आहे.

याआधी देखील २६ ऑक्टोबर रोजी हवालाच्या माध्यमातून व्यवहार झाल्यामुळे रांची, जमशेदपूर, गिरिडीह आणि कोलकाता येथे छापेमारी करण्यात आली होती. ज्यात १५० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त केली होती.

झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक

झारखंडमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असून १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com