Hemant Soren CM Oath Ceremony : हेमंत सोरेन घेणार उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांना शपथ विधीचे आमंत्रण

Hemant Soren Jharkhand CM Oath Ceremony : देशातील झारखंड आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला आहे. झारखंडमध्ये इंडिया इंडिया आघाडीच्या नेतृत्वात हेमंत सोरेन यांनी बाजी मारली. तर महाराष्ट्रात भाजप नेतृत्वातील महायुतीला यश आले आहे.
Hemant Soren
Hemant SorenAgrowon
Published on
Updated on

Pune News : महारष्ट्रासह झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला. झारखंडमध्ये पुन्हा एकदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार आहेत. इंडिया आघाडीच्या नेतृत्वात सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाला ५६ जागा जिंकून देत दणदणीत विजय मिळवला आहे. आता सोरेन उद्या म्हणजेच गुरूवारी (ता.२८) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांना शपथ विधीचे आमंत्रण दिले आहे.

झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडल्या. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ४१ जागांसाठी १३ नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यातील ३८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. झारखंडमधील ८१ जागांपैकी भाजपला केवळ २४ जागा मिळवता आल्या आहेत. (Jharkhand CM Oath Ceremony)

Hemant Soren
Hemant Soren : झारखंड निवडणुकीपूर्वी हेमंत सोरेन यांच्या खासगी सचिवाच्या घरावर छापा; आयकर विभागाची कारवाई

पंतप्रधान मोदींसह दिग्गजांना निमंत्रण

हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली असून हेमंत सोरेन त्यांचा शपथविधी सोहळा रांचीच्या मोरहाबादी मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला 'इंडिया' आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यासह दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोरेन यांनी प्रत्यक्ष भेटून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.

दरम्यान सोरेन यांनी २४ नोव्हेंबर रोजी आपला पदाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला होता. आता गुरूवारी (ता.२८) ते पुन्हा एकदा झारखंडचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. झारखंडमध्ये जेएमएमला दुसऱ्यांदा मोठा विजय मिळाल्याने हेमंत सोरेन यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

Hemant Soren
Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

झारखंडमध्ये पक्षीय बलाबल

झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला दणदणीत विजय मिळाला आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा असून झारखंड मुक्ती मोर्चा (JMM), काँग्रेस, आरजेडी आणि सीपीआयने (एमएल) एकूण ५६ जागा जिंकल्या. यात एकट्या झारखंड मुक्ती मोर्चा ३४, काँग्रेस १६, आरजेडी ४ आणि सीपीआयला (एमएल) २ जागा जिंकता आल्या.

निवडणुकीआधी जेलवारी

हेमंत सोरेन यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) कारवाई केली होती. त्यांना या प्रकरणात सहा महीने जेलमध्ये राहवे लागले. सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यानंतर चंपाई सोरेन यांनी फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र अवघ्या पाच महिन्यांतच चंपाई सोरेन यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दरम्यान झारखंड उच्च न्यायालयाने सोरेन यांना २८ जुनमध्ये जामीन मंजूर करत ते प्रथमदर्शनी दोषी नसल्याचे म्हटले होते. यानंतर ४ जुलै रोजी सोरेन यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर विधानसभा निवडणुकीत झारखंडमधील सत्ता पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com