Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : कोकणात कोसळधारा, नद्यांना रौद्ररुप; रेल्वे सेवाही ठप्प, राज्यालाही झोडपले

Maharashtra Rain Update : कोकणासह राज्याच्या विविध जिल्ह्यात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे कोकणातील अनेक नद्यांनी रौदरुप धारण केले. तर याचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून कोकणात पावसाच्या कोसळधारा बरसल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाने झोडपले असून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

कोकणात सलग सुरू असणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी, नारंगी नदी, चिपळूणची वशिष्टी, मंडणगडमधील भारज नदी आणि नागोठण्याच्या अंबा नदीने पात्र ओलांडले आहे. या नद्यांना सध्या पूर आला आहे. तर रस्ते, शेती पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचा वेग देखील थांबला आहे. खेड ते दिवाणखवटी दरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून प्रशावाशांचे हाल होत आहेत. दरम्यान रत्नागिरी आणि रायगडला ‘रेड अलर्ट’ देखील हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनासह पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

रत्नागिरी मुसळधार पाऊस सुरूच

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. रविवारी जिल्ह्याला धुतल्यानंतर सोमवारी (ता.१५) देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान चिपळूण शहरात देखील पावसाने जोर धरला आहे. चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

दापोलीत डोंगर खचला

जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील साखलोळी येथे डोंगर खचला आहे. याबाबतचा व्हिडिओ समोर आला असून डोंगरावरची माती खाली सरकली आहे. तर संपूर्ण डोंगर खचून खाली आला आहे.

कोकण रेल्वे ठप्प

दिवाणखवटी रेल्वे स्टेशनच्या जवळ रुळावर माती आल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. चिपळूण रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी रेल्वेची वाट पाहत ताटकळत बसलेले प्रवाशांना मुंबई जाण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली आहे. तर रत्नागिरी स्थानकावरून २५ बस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.

दोन ते तीन तासात कोकण रेल्वे धावणार

दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील दरड हटवण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सध्या युद्ध पातळीवर काम केले जात असून ट्रॅकवर आलेली माती हटवली जात आहे. त्यामुळे दोन ते तीन तासानंतर ठप्प झालेली कोकण रेल्वे पुर्वपदावर येईल.

परीक्षा पुढे ढकलल्या

तर गेल्या तीन दिवसापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अतिवृष्टीने झोडपले आहे. आता देखील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर दूर व ऑनलाईन शिक्षण केंद्र, मुंबई विद्यापीठाच्या सोमवारी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

नाशकाच्या पाणीसाठ्या वाढ

नाशिकला पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. यावरून जिल्ह्यात यंत्रणा सतर्क झाल्या असून आपत्कालीन विभागाच्या सर्व विभागांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा धरणात ४० टक्के तर गंगापूर धरणात ३३ टक्के पाण्याची आवक झाली आहे.

नगरला हलक्या सरी

रविवारी नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर शेवगाव तालुक्यातील गदेवाडीसह विविध ठिकाणी दमदार पाऊस झाला. श्रीरामपूर शहर व तालुक्यातही पाऊस कोसळला. तसेच संगमेनरासह अकोलेच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मुसळधार

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला देखील रविवारी पडलेल्या पावसाने दिलासा दिला. येथे २४ तासांत झालेल्या पावसाने आठवडाभराची कसर भरून काढली. तर धरण क्षेत्रात तर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी २५.९ फुटांवर गेली असून जिल्ह्यातील एकूण ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच सातारा, सांगली या जिल्ह्यांतही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कृष्णा कोयना नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून पडलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत दहा फुटांनी वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT