Mumbai Rains Update : कोकणासह मुंबईत पावसाचा हाहाकार; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. नद्या, नाल्यांवर पाणी आल्याने रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर जोरजार पावसामुळे कोल्हापुरात ५७ बंधारे पाण्याखाली गेले असून कोकणातील जवळपास २७ गावांचा संपर्क तुटला आहे.
Rains Update
Rains UpdateAgrowon

Pune News : मुंबई, ठाणे, पालघर संपूर्ण कोकणासह विदर्भाच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापुरातील पंचगंगा नदीने पात्र ओलांडले आहे.

त्यामुळे राज्याभरात पाणीच पाणी झाले आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून अनेक रस्ते पाण्या खाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गांवांचा संपर्क तुटला आहे. तर कोल्हापुरात ५७ बंधारे पाण्याखाली गेले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत रस्त्यांना नदीचे स्वरूप

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसापासून पाऊस होत आहे. मात्र सोमवारी पहाटे फक्त ६ तासात ३०० मिलीमिटर पाऊस झाल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे.

अनेक ठिकाणी रेल्वे रूळांवर पाणी साटल्याने रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यातील काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. तर मुसळधार पावसामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Rains Update
Maharashtra Rain Update : पावसाचा जोर; पंचगंगा पात्रा बाहेर, मुंबईत एनडीआरएफची पथके तैनात

ठाण्यात १८ गाव-पाड्यांचा संपर्क तुटला

मुसळधार पावसाने ठाण्याला देखील झोडपून काढले असून चिखले गावातील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील सुमारे १८ गाव-पाड्यांचा संपर्क तुटला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

दरम्यान कोकणातही मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून ओरोस येथे महामार्गावर पाणी आले आहे.

तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने नद्या-नाले तुडूंब भरून वाहात आहेत. निर्मला नदीला पूर आल्याने २७ गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच कणकवलीतील गड नदी, तेरेखोल नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नद्याकाठच्या गावांना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पूर स्थिती

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर सुरु असून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र जिल्ह्यातील काजळी, अर्जुना, कोदावली, शास्त्री, मुचकुंदी नदी इशारा पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरले होते. ते पाणी आता ओसरले आहे.

Rains Update
Monsoon Session 2024 : मुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका; आमदारांसह मंत्र्यांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

रायगडावर पर्यटक अडकले

सोमवारी रायगडात मुसळधार पाऊस कोसळला. तर येथे काही भागात ढगफुटी झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. किल्ले रायगडावर देखील ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहत आहे.

या पाण्याला रौद्र रुप आल्याने पर्यटनासाठी गेलेले पर्यटक आडकले होते. तर किल्ल्याच्या पायऱ्यांवर वाहणाऱ्या पाण्यास धबधब्याचं स्वरुप आल्याने पर्यटकांना खाली उतरणं कठीण झालं आहे.

पंचगंगेला पूर

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाला. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२.०९ फुटांवर आली आहे.

तर जिल्ह्यातील तब्बल ५७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे काही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच राधानगरी धरण ४२ टक्के भरले असून, धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १३०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर वारणा धरणातून ६७५ घनफूट पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

शाळांना सुट्टी जाहीर

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणेसह मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान हवामान विभागानं रायगड, रत्नागिरीसह मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com