Heavy Rain Parbhani Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Rainfall : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १२ मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : परभणी जिल्ह्यातील ३ मंडलांत काही तासांच्या अवधीत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अनेक दिवसांच्या खंडानंतर गुरुवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास मध्यम ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३ मंडलांत काही तासांच्या अवधीत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. त्यात जिंतूर मंडलात १३७ मिमी, वाघी धानोरा मंडलात १६५.३ मिमी, सेलू मंडलात ११४.३ मिमी पावसाची नोंद झाली. या दोन जिल्ह्यांतील १२ मंडलांत अतिवृष्टी झाली.

मुसळधार पाऊस झालेल्या भागातील जमिनी खरडून गेल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे खरीप पिकांना परत एकदा जीवदान मिळाले असले तरी अनेक मंडलांत कमी पाऊस असल्यामुळे पिके धोक्यात आहेत.

अनेक भागात दुबार पेरणीचे सावट आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी तालुक्यांतील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला. सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांत पासाचा जोर कमी होता.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये सरासरी ३४.४ मिलिमीटर, तर जुलै महिन्यात आजवर एकूण सरासरी ७३ मिलिमीटर (६०.७ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा १ जूनपासून आजवर २६५.५ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५४.१ मिमी (५८ टक्के) पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २९ मंडलांत पावसाची नोंद झाली.

वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत सरासरी १४.१ मिलिमीटर, तर जुलै महिन्यात आजवर सरासरी ७९.५ मिलिमीटर (६३ टक्के) पाऊस झाला. १ जून पासून आजवर सरासरी २९५.४ मिलिमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात २११.५ मिलिमीटर (७१.६ टक्के) पाऊस झाला.

अतिवृष्टी झालेली मंडले (पाऊस मिमीमध्ये) ः परभणी जिल्हा ःपेडगाव ७८.३, जांब ६८.८, जिंतूर १३७, वाघी धानोरा १६५.३, सेलू ११४.३, देऊळगाव गात ८४.३, चिकलठाणा ८२.३, मोरेगाव ६९.३, मानवत ९४, पाथरी ९४, कासापुरी ८८.५, हिंगोली जिल्हा ः हट्टा ६५. मंडळनिहाय (१५ मिमीपुढे) ः परभणी जिल्हा ः झरी ४०.५, टाकळी कुंभकर्ण ३०.३, सावंगी म्हळासा १८.५, बामणी २९.३,

बोरी २७.८, आडगाव २९.३, चारठाणा ४४.३, दूधगाव ४०.५, वालूर २८.३, कुपटा ४७.३, केकरजवळा २७.८, कोल्हा ५५.८, ताडबोरगाव ५५.८, बाभळगाव २७.८, सोनपेठ ४१.५, पिंपळदरी १८. हिंगोली जिल्हा ः टेंभुर्णी २२.८, कुरुंदा ३९.३, औंढा नागनाथ ३२.५, येळेगाव ३७.५, साळणा ३२.५, जवळा बाजार ४८, साखरा २१.८, हत्ता १८.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly: आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळ परिसरात बंदी; अध्यक्षांचा निर्णय

Crop In Crisis : निलंग्यात ८० हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Jal Jeevan Mission : लातूर जिल्ह्यातील गावागावांतील ‘जल जीवन’ला घरघर

Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, काकडीला मागणी, चिकू महागला; बाजरीचे दर स्थिर, तुरीचे दर दबावात

Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

SCROLL FOR NEXT